मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडमधील कपूरनंतर खान कुटुंबातही कोरोना, सलमानची वहिनी सीमा खान पॉझिटिव्ह

बॉलिवूडमधील कपूरनंतर खान कुटुंबातही कोरोना, सलमानची वहिनी सीमा खान पॉझिटिव्ह

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा  हिला कोरोनाची लागण झाली आहे. आता यानंतर कोरोनाचा शिरकाव सलमान खानच्या (salman khan) कुटुंबातही झाला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा हिला कोरोनाची लागण झाली आहे. आता यानंतर कोरोनाचा शिरकाव सलमान खानच्या (salman khan) कुटुंबातही झाला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा हिला कोरोनाची लागण झाली आहे. आता यानंतर कोरोनाचा शिरकाव सलमान खानच्या (salman khan) कुटुंबातही झाला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Tested Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. करीनासह तिची जवळची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. आता यानंतर कोरोनाचा शिरकाव सलमान खानच्या (salman khan) कुटुंबातही झाला आहे.

सलमान खानची वहिनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानला (seema khan corona positive) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यासोबतच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरला (maheep kapoor   corona positive ) देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. करण जोहरच्या डिनर पार्टीमुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. करीना कपूरने देखील कोरोना लागण होण्यचे कारण स्पष्ट केले आहे.

करीना कपूर, करिष्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा तसेच सोहेल खानची पत्नी सीमा खाना आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर ही गर्ल गॅंग अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. आता यातील चार जणींना कोरोनाची लागण झाल्याने बी टाऊनमध्ये विविध चर्चाणा उधाण आलं आहे. तर तिकडं करीनाने त्या एका व्यक्तीमुळे कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले आहे. त्या व्यक्तीच्या बेजबापदापणामुले कोरोनाच्या लागण झाल्याचे सांगितले आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे याचा मात्र अद्याप खुलासा झालेला नाही.

वाचा : पार्टीमुळे नाही, त्या व्यक्तीमुळे कोरोना झाला - करीनाने दिली पहिली प्रतिक्रिया

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सातत्याने कोविड 19 संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करतायेत. मुंबई महापालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल ज्या पोटतिडकीने कोविड 19 संसर्गा रोखण्यासाठी जीवाचा आटापीटा करतायेत. मात्र दूसरीकडे जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले सूपरस्टार कोविड 19 प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत त्यांचे पार्टी लाईफ सुरू ठेवत आहेत. त्याचाच असा परिणाम आता दिसू लागलांय.

वाचा : अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडकरांना पार्ट्या भोवणार?

करीना व अमृता यांच्या संपर्कात आल्या आहेत त्या सर्वांची आता कोविड 19 चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. आज आणखी काही बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट मिळतील.  

First published:

Tags: Bollywood News, Corona, Entertainment, Kareena Kapoor, Salman khan