JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / आता ओमिक्रॉनचं निदान अधिक सोपं; त्वचेवरच दिसतंय Omicron symptoms

आता ओमिक्रॉनचं निदान अधिक सोपं; त्वचेवरच दिसतंय Omicron symptoms

Omicron symptoms on skin : ओमिक्रॉनचा त्वचेवरही दिसून येतोय परिणाम.

जाहिरात

पहिल्या पावसातील खराब पाण्यामुळे आपल्याला स्कीनचे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. हवेतील प्रदूषित घटकांमुळे आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. अनेकांना पहिल्या पावसात भिजल्यानंतर स्कीन प्रॉब्लेम सुरू झाल्याचे दिसून येते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 डिसेंबर : कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) अद्याप अभ्यास सुरू आहे. या व्हेरिएंटची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये लक्षणं (Omicron symptoms)  दिसतच नाहीत. तर काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आपल्याला ओमिक्रॉन झाला हे सुरुवातीलाच कसं ओळखावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अशात ओमिक्रॉनचं एक नवं लक्षण समोर आलं. हे लक्षण आपण स्पष्टपणे पाहू शकतो. ओमिक्रॉनचं हे लक्षण आपल्या त्वचेवर दिसत आहे (Skin symptoms of omicron). ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने नाक वाहणं, खशात खवखव, शिंक येणं, पाठीमागे एका बाजूला वेदना, स्नायूंमध्ये वेदना, रात्री घाम येणं. पण आता ओमिक्रॉनचं लक्षण हे त्वचेवरही दिसतं आहे (Omicron symptoms skin rashes). झी न्यूज ने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार ZOE कोविड सिम्पटम स्टडी अॅपच्या नुसार ओमिक्रॉन संसर्ग असल्यास त्याचा त्वचेवरही परिणाम दिसून येतो. हे वाचा -  महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असल्यास त्वचेवर दोन प्रकारे परिणाम होतो. एक म्हणजे अचानक तुमच्या त्वचेवर खूप रॅशेस येतात. याला खूप खाज येते. हातापायाच्या तळव्यांनाही सर्वात जास्त खाज येते. दुसरा परिणाम म्हणजे घामोळे येतात. हाताचा कोपरा आणि गुडघ्यावर जास्त घामोळे असतात. ओमिक्रॉनमुळे त्वचेवर रॅशेस येण्याची समस्या वयस्कर व्यक्तींच्या तुलनेत तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहे. डॉक्टर डेव्हिड लॉयड यांनी सांगितलं, ओमिक्रॉन संक्रमित 15 टक्के तरुणांच्या त्वचेवर रॅशेस आहेत. यासोबत त्यांना थकवा, डोकेदुधी, भूक न लागणं अशी समस्याही दिसून आली आहे. हे वाचा -  ओमिक्रॉनच्या संकटात दिलासा! व्हेरिएंटला निष्क्रिय करणाऱ्या अँटिबॉडीज सापडल्या त्वचेवर चकत्या येतात. तज्ज्ञ या ओमिक्रॉनचं प्रमुख लक्षण मानत आहेत. या लक्षणामुळे आता ओमिक्रॉनचं निदान करणं अधिक सोपं झालं आहे. अशी लक्षणं दिसताच सावध व्हा. सामान्य स्किन समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांकडे जा किंवा आपली कोरोना टेस्ट करून घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या