मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Corona | महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

Maharashtra Corona | महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Maharashtra Corona Cases : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. राज्यात दिवसभरात तब्बल 8 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

मुंबई, 31 डिसेंबर : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट (Maharashtra Corona Third Wave) धडकली आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण आज या रुग्णसंख्येचा विस्फोट झालाय. कारण राज्यात आज दिवसभरात 8 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai Corona), पुणे (Pune Corona), नागपूर (Nagpur Corona) यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा फोफावताना दिसतोय. नागपुरात तर आज 80 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातही हाच आकडा 400 च्या पुढे गेला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट गतीने वाढतोय. मुंबईत आज तब्बल 5 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.

महाराष्ट्रात मंत्र्यांना कोरोना

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाची ही तिसरी लाट मंत्रिमंडळातही धडकली आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विधीमंडळात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच विधान भवन परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये कोरोना वाढला, मुंबईत प्रचंड वाढ

महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 8,067  नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबई शहरातच 5428 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील कोरानाबाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत काल 3671 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज थेट हाच आकडा 5428 वर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 1,766  जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

नागपुरात एकाच दिवसात रुग्णसंख्येत तीनपटीने वाढ

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या थेट तीनपटीने वाढल्याचं चित्र आहे. नागपुरात काल 27 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पण आज थेट हाच आकडा 81 वर पोहोचला आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 'थांबायचं नाही, पण...', महाराष्ट्र कोरोनाच्या सावटाखाली असताना मुख्यमंत्र्यांचे धीर देणारे बोल

नागपुरातील आठवड्याभरात किती रुग्ण वाढले?

23 डिसेंबर - 6 रुग्ण

24 डिसेंबर - 10 रुग्ण

25 डिसेंबर- 21 रुग्ण

26 डिसेंबर- 33 रुग्ण

27 डिसेंबर- 12 रुग्ण

28 डिसेंबर- 35 रुग्ण

29 डिसेंबर- 29 रुग्ण

30 डिसेंबर- 31 रुग्ण

31 डिसेंबर- 88 रुग्ण

First published:
top videos