JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / डॉक्टर Omicron कोरोना प्रकारावर कसे उपचार करतात? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

डॉक्टर Omicron कोरोना प्रकारावर कसे उपचार करतात? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) जगभरात चौथी तर भारतात तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत झपाट्याने वाढणाऱ्या बाधित रुग्णांवर (Infected Pateints) उपचार करण्यासाठी डॉक्टरही सज्ज झाले आहेत. यावेळेस ओमिक्रॉन व्हेरिएंट आधीच्या डेल्टा प्रकारापेक्षा वेगळा आहे, त्यामुळे त्याला सामोरे जाण्याची पद्धतही वेगळी आहे.

जाहिरात

Hospital Representative Image

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर : कोरोना संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरल्याने आता महामारी (Pandemic) संपली म्हणून अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, गेल्या महिन्यापासूनच ओमिक्रॉन प्रकाराने (Omicron Variant) दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. यामुळे जगभरात तसेच भारतात कोविड-19 ची नवी लाट येण्याची चिन्हे आहेत. दिल्ली आणि मुंबईत कोरोना संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ याचे संकेत देत आहेत. ओमिक्रॉन संसर्गाची लक्षणे पूर्वीच्या कोरोना प्रकारांपेक्षा थोडी वेगळी आहेत, त्यामुळे त्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार (Corona Treatment) केले जात आहेत. या नवीन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांवर ते कसे उपचार करत आहेत हे दिल्लीच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या अद्याप तरी कमी दिल्लीतील ओमिक्रॉन प्रकारांच्या उपचारांसाठी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातच व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत, LNJP मध्ये ओमिक्रॉन प्रकारांची फक्त 40 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 19 डिस्चार्ज देखील झाले आहेत. एलएनजेपीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जगभरात आढळत असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांसारखीच लक्षणे दिल्लीतही आढळून येत आहेत. Omicron ची लक्षणे काय आहेत? एलएनजेपीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की येथे येणाऱ्या ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यामध्ये घसा खवखवणे, कमी पातळीचा ताप आणि शरीराच्या अवयवांमध्ये वेदना यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. त्यासाठी मल्टीव्हिटामिन आणि पॅरासिटामॉल यांसारख्या औषधांनी उपचार केले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीर उपचार आवश्यक नाही Omicron प्रकारावर चालू असलेल्या उपचारांबाबत, NLJP चे वरिष्ठ डॉक्टर म्हणतात, “आम्हाला असे वाटत नाही की सध्या रुग्णांना इतर कोणत्याही प्रकारचे औषध देण्याची गरज आहे. Omicron बद्दल असे सांगितले जात आहे की हा प्रकार वेगाने पसरतो. मात्र, डेल्टा प्रकाराच्या तुलनेत त्याचा प्रभाव धोकादायक नाही. कोरोना काळात लग्न थांबल्यास नो टेन्शन! ₹7500मध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचा विमा डेल्टा प्रकाराप्रमाणे प्राणघातक नाही ओमिक्रॉन हे SARS Cove-2 चा नवीन प्रकार आहे जो गेल्या महिन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. हा विषाणू आधीच्या डेल्टा प्रकारापेक्षा वेगाने पसरत असल्याचे समोर आलं आहे. इतकेच नाही तर आधीच्या प्रकारांप्रमाणे या संसर्गामध्ये फुफ्फुसांना इजा न करता घशात विषाणू वाढतात. फुफ्फुसावर परिणाम नाही ओमिक्रॉनच्या रुग्णांना इतर उपचारांची गरज नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डेल्टा प्रकारामुळे थेट फुफ्फुसांवर परिणाम होत असे, ज्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास व्हायचा. अशावेळी न्यूमोनिया देखील व्हायचा. सुदैवाने ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गामध्ये अशी लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहिला पेशंटचा अनुभव काय होता? दिल्लीतील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण, ज्याला नुकताचं डिस्चार्ज देण्यात आला. त्याने सांगितलं की त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. ओमिक्रॉनची चाचणी पॉझिटिव्ह आली तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. कारण, त्याला कोणताही त्रास जाणवत नव्हता. याचं एक कारण हे देखील होते की त्याला आधीच कोविडची लागण झाली होती. या 37 वर्षीय व्यक्तीने सांगितले की त्याला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. धोक्याची घंटा; भारतात कोरोनाच्या संख्येत 43 टक्क्यांनी वाढ, पुन्हा Lockdown ? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिल्लीच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत 67 हून अधिक ओमिक्रॉन प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या भारतात फक्त 358 होती पण तेव्हापासून ही संख्या झपाट्याने वाढत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवाच्या वातावरणात सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे केंद्राने राज्य सरकारांना बजावले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या