मराठी बातम्या /बातम्या /मनी /Wedding Insurance: कोरोना काळात लग्न थांबल्यास नो टेन्शन! ₹7500मध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचा ‘विवाह विमा’

Wedding Insurance: कोरोना काळात लग्न थांबल्यास नो टेन्शन! ₹7500मध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचा ‘विवाह विमा’

लग्नासाठी सगळी तयारी करून ऐनवेळी जर लॉकडाऊन लागले, तर हा पूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असं होऊ नये यासाठी एक भन्नाट उपाय (Wedding Insurance) उपलब्ध आहे. तो म्हणजे, विवाहाचा विमा!

लग्नासाठी सगळी तयारी करून ऐनवेळी जर लॉकडाऊन लागले, तर हा पूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असं होऊ नये यासाठी एक भन्नाट उपाय (Wedding Insurance) उपलब्ध आहे. तो म्हणजे, विवाहाचा विमा!

लग्नासाठी सगळी तयारी करून ऐनवेळी जर लॉकडाऊन लागले, तर हा पूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असं होऊ नये यासाठी एक भन्नाट उपाय (Wedding Insurance) उपलब्ध आहे. तो म्हणजे, विवाहाचा विमा!

    मुंबई, 30 डिसेंबर: लग्नकार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आपल्याकडे पहिली पत्रिका देवासमोर ठेवण्याची परंपरा आहे. यामुळे लग्न कोणत्याही विघ्नाशिवाय सुरळीतपणे पार पडतं अशी लोकांची श्रद्धा असते. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कित्येक जणांची लग्नं रद्द (Marriage cancelled due to corona) झाली आहेत, किंवा पुढे ढकलावी लागली. अशा वेळी मग बऱ्याच लोकांचा लग्नासाठी हॉल बुक करणे, केटरिंग किंवा फोटोग्राफरला दिलेला ॲडव्हान्स अशा गोष्टींवर केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला.

    येत्या वर्षात (2022) जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशा वेळी मग हॉल बुक करायचा की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये अनेक जण अडकले आहेत. कारण सगळी तयारी करून ऐनवेळी जर लॉकडाऊन लागले, तर हा पूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असं होऊ नये यासाठी एक भन्नाट उपाय (Wedding Insurance) उपलब्ध आहे. तो म्हणजे, विवाहाचा विमा!

    हे वाचा-हृदयातही घुसतोय कोरोना; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

    ऐकायला वेगळं वाटत असलं, तरी वेडिंग इन्शुरन्स (Importance of Wedding Insurance) हा अगदी महत्त्वाचा आहे. ऐनवेळी लग्न रद्द झाल्यास, लग्नासाठी केलेल्या खर्चाची बरीच रक्कम तुम्हाला या विम्याच्या मदतीने कव्हर (Wedding Insurance Cover) करता येते. यामध्ये चार प्रकारची कव्हर उपलब्ध आहेत.

    1. देणेकऱ्यांचं कव्हर : विवाह रद्द झाल्यास या कव्हरमध्ये तिसऱ्या पक्षाचे, म्हणजेच थर्ड पार्टीचे नुकसान (Third party cover) वाचवले जाते. अपघातामुळे विवाह रद्द झाल्यास हा क्लेम करता येतो.

    2. कॅन्सलेशन कव्हरेज : अचानक आणि अस्पष्ट कारणांमुळे विवाह रद्द झाल्यास (Marriage cancelled due to unexplained reasons) या कव्हरच्या माध्यमातून क्लेम करता येतो.

    3. संपत्ती नुकसान : विवाह सोहळ्यादरम्यान काही अपघात झाल्यामुळे संपत्तीला होणाऱ्या नुकसानासाठी या माध्यमातून क्लेम करता येतो.

    4. दुर्घटना : अपघातामुळे नवरदेव वा वधू जखमी झाल्यास, त्यांचा रुग्णालयातील खर्च यातून कव्हर केला जातो.

    काय काय होतं कव्हर?

    विवाह विमा हा लग्नासाठी केलेला जवळपास सगळाच खर्च (What is covered under Wedding Insurance) परत मिळवून देऊ शकतो. यामध्ये मग केटरिंग ॲडव्हान्स, हॉल ॲडव्हान्स, ट्रॅव्हल एजन्सींना दिलेला ॲडव्हान्स, हॉटेलच्या रुम्स बुक करण्यासाठी दिलेला ॲडव्हान्स, लग्नाचा सेट उभारण्यासाठी केलेला खर्च, पत्रिका छापण्यासाठी केलेला खर्च, तसेच संगीत समारंभ वा सजावटीसाठी दिलेला ॲडव्हान्स अशा सर्व प्रकारच्या खर्चाची रक्कम तुम्हाला परत मिळू शकते.

    हे वाचा-आता कोरोना लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही; हातातच बसवली जाणार मायक्रोचीप

    किती असतो प्रीमियम?

    तुम्ही किती रुपयांचा विमा घेत आहात यानुसार तुमचा प्रीमियम (Wedding Insurance Premium) ठरतो. जर तुम्ही 10 लाख रुपयांचा विवाह विमा घेतला आहे, तर तुम्हाला 7,500 ते 15,000 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागतो. म्हणजेच, एकूण रकमेच्या 0.7 ते 2 टक्के एवढाच प्रीमियम तुम्हाला भरावा लागतो.

    कोणत्या स्थितीत करू शकता क्लेम?

    लग्नामध्ये विविध प्रकारची विघ्नं येऊ शकतात. यामध्ये लग्न रद्द होणं, चोरी होणं, आगीची दुर्घटना किंवा इतर दुर्घटनेमुळे नुकसान होण्याची शक्यताही असते. अशा सर्व घटनांमध्ये विवाह विम्याअंतर्गत क्लेम करता येतो. दरम्यान काही अशी कारणंही आहेत, ज्यामुळे लग्नात अडथळा आल्यास तुम्ही क्लेम करू शकत (Wedding Insurance claim rules) नाही. पाहूयात अशा गोष्टींची यादी –

    >> दहशतवादी हल्ला

    >> संप वा आंदोलन

    >> लग्न मोडणं

    >> वर किंवा वधूचे अपहरण होणं

    >> अपघातामध्ये कपडे आणि वैयक्तिक संपत्तीचे नुकसान होणं

    >> मॅरेज हॉल उपलब्ध नसल्यामुळे लग्न थांबणं

    >> विमान उशिरा आल्यामुळे वर किंवा वधू लग्नाला पोहोचू न शकणं

    >> गाडी खराब झाल्यामुळे वर किंवा वधू लग्नाला पोहोचू न शकणं

    >> पॉलिसी घेणाऱ्याच्या सांगण्यावरून विवाह स्थळाला नुकसान पोहोचवणं

    >> खूप जुन्या वस्तूंची मोडतोड वा टेक्निकल अडचणींमुळे विवाह स्थळावर नुकसान होणं

    >> निष्काळजीपणामुळे एखाद्या गोष्टीची मोडतोड होणं

    अशा कोणत्याही गोष्टीमुळे विवाह रद्द झाल्यास वा पुढे ढकलला गेल्यास तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करता येत नाही.

    हे वाचा-धोक्याची घंटा; भारतात कोरोनाच्या संख्येत 43 टक्क्यांनी वाढ, पुन्हा Lockdown ?

    इतर गोष्टींमुळे विवाह रद्द झाल्यास तुम्हाला तातडीने त्याबाबत विमा कंपनीला कळवावं लागतं. यानंतर विमा कंपनीचे अधिकारी माहितीची पडताळणी करतात. जर योग्य त्या कारणामुळे विवाह रद्द झाला असेल, तर झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीकडून तुम्हाला दिली जाते.

    दुर्घटना सांगून होत नाहीत, म्हणून भविष्यातील होणारे नुकसान टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणं कधीही चांगलं. त्यामुळे तुम्हीही पुढील वर्षी लग्नाचा बार उडवायचा विचार करत असाल; तर आधी विवाह विमा नक्कीच घ्या!

    First published:

    Tags: Corona, Corona updates