नवी दिल्ली, 30 डिसेंबर : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron variant) चिंता वाढवली असतानाच आता भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus cases spike in India) होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 13154 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. ही वाढ बुधवारच्या तुलनेत तब्बल 43 टक्क्यांनी अधिक आहे. बुधवारी (29 डिसेंबर 2021) राज्यात 9 हजार कोविड बाधितांची नोंद झाली होती. (Coronavirus cases raises in India)
गेल्या 24 तासांत भारतात 13154 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 268 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच कोरोनाच्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ होतना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 263 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 961 इतकी झाली आहे. ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या ही दिल्ली आणि महाराष्ट्रात आहे. दिल्लीत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 263 इतकी आहे तर महाराष्ट्रात 252 इतकी आहे.
India reports 13,154 new COVID19 cases in the last 24 hours; Omicron case tally rises to 961 with 263 cases in Delhi and 252 in Maharashtra pic.twitter.com/LEea2AP2UO
— ANI (@ANI) December 30, 2021
भारतात सध्यस्थितीत एकूण 82,402 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या भारतातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर 98.38 टक्के इतका आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 7,486 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण 3,42,58,778 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात कोरोनासह Omicron च्या रुग्णांत मोठी वाढ
राज्यात बुधवारी (29 डिसेंबर) एकाच दिवसात 85 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना रुग्णाबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 85 ओमायक्रॅान रूग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये मुंबईत 34, नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहे. पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॅान रूग्णांचा आकडा आता 252 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ
मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी (29 डिसेंबर) एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण 2510 आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार पार आल्यामुळे चिंतेत भर घातली आहे.
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी (29 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. मुंबईत दररोज 51 हजार चाचण्या केल्या जात आहेत. सध्या 2200 केसेस सापडत आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट 4 वर आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट नक्कीच चांगला नाहीये. यामुळे आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
आपल्या येथे जर निर्बंधांचे पालन केले नाही आणि सहजासहजी सर्व गोष्टी घेतल्या तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्याया करावेच लागेल. निर्बंध लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे घेईल. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि कदाचित थोड्या प्रमाणात निर्बंध लावण्यावर निर्णय होऊ शकेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, India, महाराष्ट्र