JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाइनचे दिवस ठरले, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध कडक

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाइनचे दिवस ठरले, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध कडक

भारतात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 जानेवारी : केंद्र सरकारने देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना किमान 7 दिवसांसाठी होम क्वारंटाइन अनिवार्य करण्यात आलं आहे. यापूर्वी 7 दिवसांच्या क्वारंटाइनचा नियम केवळ ‘अॅट रिस्‍क’ असणाऱ्या देशातील प्रवाशांसाठी करण्यात आला होता. मात्र आता ‘नॉन अॅट रिस्‍क’ देशांच्या प्रवाशांसाठी होम क्‍वारंटाइन अनिवार्य करण्यात आलं आहे. आठव्या दिवशी RT PCR चा नियम नॉन एट रिस्‍क प्रवाशांसाठी आहे. दोन्ही श्रेणीच्या प्रवाशांना RT PCR चा रिझल्ट ‘एयर सुविधा’ वर अपलोड करावा लागेल. देशभरात ओमायक्रॉनचे रुग्ण 3 हजारांहून अधिक झाले आहेत. तर देशात दररोज 1 लाख 17 हजारहून अधिक रुग्ण आहेत. दररोज मृत्यूचा आकडादेखील शुक्रवारी 300 हून अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या ताज्या रुग्णसंख्येनंतर At risk कॅटेगरीमधील देशांची संख्या वाढून 19 झाली आहे. याशिवाय आणखी 9 देशांचा या कॅटेगरीमध्ये समावेश आहे. 1 डिसेंबर पासून परदेशातून भारतात येणाऱ्या गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या गाइडलाइन, at risk countries सह 11 जानेवारीपासून लागू करतील. हे ही वाचा- भारतात Omicron नं घेतला आणखी एकाचा जीव, महिलेचा मृत्यू आरोग्य मंत्रालयाच्या 1 डिसेंबरच्या गाइडलाइन्सनुसार 11 देशांना At risk मध्ये सामील करण्यात आलं होतं. यात यूके सह यूरोपातील देश, दक्षिण अफ्रिका, ब्राझील, बोत्‍सवाना, चीन, मॉरीशस, न्‍यूजीलँड, झिम्‍बाब्‍वे, सिंगापुर, हाँगकाँग आणि इजरायल सामील होते. आता नव्या गाइडलाइन जारी झाली असून यात आणखी 9 देशांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या