नवी दिल्ली, 07 जानेवारी: ओमायक्रॉनचा (omicron) कहर झपाट्यानं वाढू लागला आहे. आता या नवीन व्हेरिएंटनं देशात आणखी एक जीव घेतला आहे. ओडिशातील (Odisha) बोलंगीर येथे एका 55 वर्षीय महिलेचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाला. यापूर्वी, राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur, Rajasthan) एका 73 वर्षीय व्यक्तीचा नवीन व्हेरिएंटमुळे (New Variant) मृत्यू झाला होता. त्यांचीही कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे. 27 डिसेंबर रोजी संबलपूर जिल्ह्यातील वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (VIMSAR) मध्ये महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली होती, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. अगलपूर गावातील रहिवासी असलेली ही महिला रुग्ण परदेशात गेली नव्हती. गेल्या महिन्यात त्यांना स्ट्रोक आला होता, त्यानंतर त्यांना 20 डिसेंबर रोजी बालंगीर येथील भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हेही वाचा- पुण्यात कोरोनाचा Outbreak, सलग पाचव्या दिवशी रुग्णांचा आकडा भयानक बालंगीरच्या CDMO स्नेहलता साहू यांनी सांगितलं की, दोन दिवस रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेला संबलपूरमधील बुर्ला येथील विमसार येथे रेफर करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 डिसेंबरला ही महिला कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर ओमायक्रॉनची तपासणी करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले. जिथे महिलेला नवीन व्हेरिएंटचा त्रास होत असल्याचं दिसून आलं. चार दिवसांनंतर 27 डिसेंबरला महिलेचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये पहिला मृत्यू राजस्थानच्या उदयपूरमधील लक्ष्मी नारायण परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाचाही ओमायक्रोनमुळे मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनीही एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मृताच्या शरीरात ओमायक्रॉनची उपस्थिती तपासात आढळून आली होती. 21 डिसेंबर रोजी रुग्ण कोरोना निगेटिव्ह (corona negative) आला होता. 25 डिसेंबर ला रुग्णाला omicron व्हेरिएंटचा (omicron variant) संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाची लागण झाल्यापासून रुग्ण रुग्णालयात दाखल होता. वैद्यकीय विभाग पोस्ट कोविड न्यूमोनियाचा परिणाम असल्याचं म्हणत आहे. मृत रुग्णाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.