JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / काय म्हणावं याला! म्हणे, 'मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी', तिला पैसे देण्याचीही तयारी

काय म्हणावं याला! म्हणे, 'मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी', तिला पैसे देण्याचीही तयारी

Man Wants Corona infected woman : लोक कोरोनापासून दूर राहण्यासाठी धडपडत असताना ही व्यक्ती मात्र मुद्दामहून कोरोना पॉझिटिव्ह तरुणी शोधत आहे आणि याचं कारणही विचित्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँकॉक, 17 जानेवारी : आपल्या पार्टनरबाबत प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असतात. कुणाला सुंदर, कुणाला शिकलेली, कुणाला नोकरी करणारी अशी तरुणी हवी असते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका तरुणाला मात्र चक्क कोरोना पॉझिटिव्ह तरुणी हवी आहे (Man Wants Corona infected woman). तरुण कोरोनाग्रस्त तरुणीच्या शोधात आहे. अशा तरुणीला तर त्याने पैसे देण्याचीही तयारी दर्शवली आहे (Man Search Corona infected woman). कोरोनाव्हायरस ज्याची भीती अनेकांना वाटते. त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये, म्हणून लोक काळजी घेत आहेत, उपाय करत आहेत. कोरोना संसर्ग झालेल्या लोकांपासून दूर राहत आहेत. असं असताना थायलँडमध्ये (Thailand)  राहणारी ही व्यक्ती मात्र मुद्दामहून कोरोनाची लागण झालेलीच तरुण शोधत आहे (Man Wants to infect with Corona). या व्यक्तीने तशी जाहिरातही दिली आहे आणि यासाठी दलालाचीही मदत घेतली आहे. या व्यक्तीला कोरोनाग्रस्त महिलेसोबत पार्टी करायची आहे आणि याचं कारण म्हणजे त्याला कोरोना पॉझिटिव्ह व्हायचं आहे (Man Wants to become Corona Positive). आपल्याला कोणत्याही रोमँटिक रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही आहे. फक्त एका पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह करणारी तरुणी हवी आहे, असं या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे. हे वाचा -  Omicron कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी? शास्त्रज्ञाचा मोठा दावा डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या व्यक्तीने कायदेशीर ब्रोकरची मदत घेतली आहे जेणेकरून त्याला आपल्या कामासाठी परफेक्ट महिला भेटेल. महिलेला आपली अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं दाखवावं लागेल. त्यानंतर त्या तरुणालाही पॉझिटिव्ह करायचं आहे. या कामासाठी ही व्यक्ती त्या महिलेला £66 ते £110 म्हणजे जवळपास 11 हजार रुपये ऑफर केले आहेत. तसंच तो 1300 रुपये ब्रोकरेजही देत आहे. या विचित्र मागणीमुळे या व्यक्तीचा मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. थायलँडच्या स्थानिक मीडियाने या व्यक्तीच्या या विचित्र जाहिरातीमागील कारणही सांगितलं आहे. हे वाचा -  लाट ओसरतेय, R-Value घसरतेय; येतेय Good News थायलँडमधील इन्शूरन्स कंपन्या कोरोनाला आपल्या प्लॅनमध्ये समाविष्ट करत आहे. जर एखादी व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडली तर त्या व्यक्तीला 4 लाख रुपये दिले जातील. सुरुवातीला इन्शूरन्स कंपन्या याबाबत फार माहिती घेत नसत पण आता अधिकारी रुग्णाला स्वतः पाहतात त्यामुळे लोकांना स्वतःहून कोरोना इन्फेक्टेड व्हायसयचं आहे. थायलँडमध्ये बरेच लोक कोरोनाग्रस्त होण्याचे मार्गही सांगत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या