नवी दिल्ली, 16 जानेवारी: कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्यापूर्वीच ती ओसरू (Declining) लागल्याचं चित्र आर-व्हॅल्यूच्या (R Value) आकडेवारीवरून दिसू लागलं आहे. देशातील संसर्ग वाढण्याच्या (Infection) वेगाशी संबंधित असणारी R Value गेल्या आठवड्यात घसरली असल्याचं दिसून येत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना R Value घसरणं ही दिलासादायक बाब असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशी घसरतेय व्हॅल्यूगेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नोंदवण्यात आलेली आर व्हॅल्यू होती 2.9. त्यानंतर हा आकडा वाढायला सुरुवात झाली होती. 1 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत हा आकडा पोहोचला होता 4 वर. त्यानंतर नुकत्याच संपलेल्या आठवड्यात म्हणजेच 7 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत नोंदवण्यात आलेली आर व्हॅल्यू आहे 2.2. म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नोंदवण्यात आलेल्या आकड्यापेक्षाही कमी व्हॅल्यूची नोंद गेल्या आठवड्यात झाली आहे. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचं हे प्राथमिक लक्षण मानलं जातं. काय असते R Value?आर व्हॅल्यू हे एक व्यक्ती किती इन्फेक्शन पसरवतो, हे मोजण्याचं युनीट आहे. कोरोना इन्फेक्शन झालेल्या प्रत्येक एका व्यक्तीमुळे जर इतर 4 व्यक्ती इन्फेक्टेड होत असतील, तर R Value 4 आहे, असं मानलं जातं. जेव्हा हा आकडा अधिक असतो, तेव्हा इन्फेक्शन पसरण्याचा वेगही अधिक असतो. जेव्हा हा आकडा 1 वर येतो किंवा त्याखाली जातो, तेव्हा लाट संपल्याचं मानलं जातं. सध्या 4 वरून हा आकडा 2.2 वर येऊन ठेपला आहे.
हे वाचा -
कोरोना रुग्णसंख्येत वाढगेल्या 24 तासांत देशभरात नोंदवण्यात आलेल्या रुग्णसंख्येत मात्र काहीशी वाढ झाली आहे. शनिवारच्या एका दिवसात 2.71 लाख नव्या कोरोना रुग्णांची देशभरात नोंद झाली आहे, तर देशात सध्या 15,50,377 ऍक्टिव्ह केसेस असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यानं जाहीर केली आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.