JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाचा कहर! राज्यात सोमवारी 12 हजार नवीन रुग्णांची नोंद, Omicron बाधितांची संख्या चिंता वाढवणारी

कोरोनाचा कहर! राज्यात सोमवारी 12 हजार नवीन रुग्णांची नोंद, Omicron बाधितांची संख्या चिंता वाढवणारी

राज्यात सोमवारी कोरोनाची 12,160 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 04 जानेवारी : राज्यात सोमवारी कोरोनाची 12,160 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे (Corona Cases in Maharashtra). राज्यात 24 तासाच्या आत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच 8082 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सोबत राज्यात 68 नवीन ओमायक्रॉनबाधित (Omicron Variant) रुग्ण आढळले आहेत. यातील 40 रुग्ण मुंबईतील आहेत. ओमायक्रॉनबाधितांबद्दल बोलायचं झाल्यास राज्यात सोमवारी ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 34 जणांचा रिपोर्ट इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च तर 34 रुग्णांचा रिपोर्ट नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सने (NCCS) प्रसिद्ध केला आहे. रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईतील 40, पुण्यातील 14, नागपूर 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमधील 3 रुग्ण आहेत. याशिवाय कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा याठिकाणीही 1-1 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण आमोयक्रॉनबाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे. ठाण्यात सुद्धा 1 ते 9 वीच्या शाळा बंद, 10वी आणि 12 वीचे वर्ग सुरूच राहणार! BMC ने बिल्डिंग सिलिंगसाठी निर्देश जारी केले आहेत. यात म्हटलं आहे, की एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये फ्लॅटच्या संख्याच्या तुलनेत 20 टक्के लोक कोरोनाबाधित असतील तर संपूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाईल. मुंबईमध्ये सध्या 11 कंटेनमेंट झोन बनवले गेले आहेत तर 318 बिल्डिंग सील केल्या आहेत. मात्र रुग्णांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता बिल्डिंग सील करण्याचा आणि कंटेनमेंट झोनचा आकडाही वाढू शकतो. सोमवारच्या अपडेट आकडेवारीनुसार, भारतात मागील चोवीस तासात 34,740 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत मिळून 1888 ओमायक्रॉनबाधित रुग्ण समोर आले आहेत. यातील 737 रुग्ण बरे झाले आहेत. यातील सर्वाधिक 578 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. पुणेकर सावध राहा..! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं कोरोनाबाधित ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असतानाच भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरू होत असल्याचं म्हटलं जात आहे. अशात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. केंब्रिज यूनिव्हर्सिटीने भारतात दुसऱ्या लाटेचा अगदी योग्य अंदाज व्यक्त केला होता. अशात तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Coronavirus) इशारा हा भारतासाठी मोठा धोका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या