मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : ठाण्यात सुद्धा 1 ते 9 वीच्या शाळा बंद, 10वी आणि 12 वीचे वर्ग सुरूच राहणार!

BREAKING : ठाण्यात सुद्धा 1 ते 9 वीच्या शाळा बंद, 10वी आणि 12 वीचे वर्ग सुरूच राहणार!

ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यातील पहिली ते नववी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे पालिका व ठाणे महापौरांनी घेतला आहे

  • Published by:  sachin Salve

ठाणे, 03 जानेवारी :  राज्यात कोरोनाबाधित (corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे मुंबईमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेनं (thane municipal corporation) सुद्धा 1 ते 9 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. (Schools from 1st to 9th class closed in thane)

ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यातील पहिली ते नववी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे पालिका व ठाणे महापौरांनी घेतला आहे. अकरावीचे वर्ग ही बंद ठेवणार आहेत. फक्त 10 वी व 12 वी चे वर्ग ऑफलाइन सुरू ठेवणार असल्याचे ठाणे पालिकेने ठरवले आहे.

(तुम्हीही Jio युजर्स आहात का? सावधान, चुकूनही करू नका ही चूक अन्यथा...)

तर राज्याची राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी व 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रॉनया कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या आणि या शहरात जगभरातून  लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमायक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ. 9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते  31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.

(विराटचं एबीच्या पावलावर पाऊल, या कारणामुळे जोहान्सबर्ग टेस्टमधून माघार!)

इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार, लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करून घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.

First published:

Tags: Thane municipal corporation