प्रातिनिधिक फोटो
दुबई, 28 जानेवारी : आपल्याला कोरोना झाला हे समजताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. निम्मा जीव तर तिथंच जातो. अशाच एका व्यक्तीने तर बेशुद्धावस्थेत कोरोनाशी लढा दिला आहे. तब्बल 6 महिने कोरोनाशी झुंज देत या व्यक्तीने कोरोनावर मृत्यूवरही मात केली आहे. या प्रकरणामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहे. हा चमत्कार आहे, असं डॉक्टर म्हणाले. केरळमधील 38 वर्षांचे अरुणकुमार एम नायर (Arunkumar M Nair) यूएईमध्ये फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करतात. लोकांची सेवा करता करता त्यांनाही कोरोनाने गाठलं. त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. खरंतर डॉक्टरांनी आशा सोडली होती. कोरोनामुळे त्यांच्या फुफ्फुसाची भयंकर अवस्था झाली होती. त्यामुळे सहा महिने ते बेशुद्ध होते. आर्टिफिशिअल लंग आणि ईसीएमओ मशीनवर त्यांच्या श्वास सुरू होता. याचवेळी अनेक कॉम्प्लिकेशन्सही आले. अशाच अवस्थेत त्यांना हार्ट अटॅक आला. शिवाय अनेक गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रक्रियांनाही त्यांना सामोरं जावं लागलं. पण तरी त्यांनी कोरोनाला हरवत मृत्यूच्या दारातून ते परत आले आहेत. हे वाचा - आता नाकावाटेही मिळणार कोरोना लस; Intranasal Dose ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल गेली पाच महिने ते आयसीयूमध्ये लाइफ सपोर्टवर होते. एक महिन्यापूर्वी त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आणि आता सहा महिन्यांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. बुर्जिल हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे डॉ. तारिग अली मोहम्मद अलहसन यांनी सांगितलं, नायर यांची प्रकृती पहिल्या दिवसापासूनच खराब होतं. ते बरं होणं म्हणजे एक चमत्कारच आहे. कारण असं शक्य नाही. नायर लवकरच आपल्या कुटुंबहासोबत भारतात जातील. तिथं त्यांची फिजिओथेरेपी सुरू राहिल. पुढच्या महिन्यात ते पुन्हा सेवेत सुरू होतील, असा विश्वास त्यांना आहे. हे वाचा - 2 वर्षाचा रिअल हिरो! चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं नायर सांगतात, मला काहीच आठवत नाही आहे. मी मृत्यूच्या दारातून बाहेर आलो इतकंच मला माहिती आहे. माझे नातेवाई, मित्रमैत्रिणी आणि इतर लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेचा हा परिणाम आहे की मी आज जिवंत आहे.