भारतात 10 जानेवारी, 2022 पासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात करण्यात आली. कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि इतर आजार असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जातो आहे. हे वाचा - Corona निर्बंधासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्यांना लिहिलं पत्र नझल व्हॅक्सिनबाबत याआधी बोलताना भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांनी सांगितलं होतं की, संपूर्ण जगलाल अशी लस हवी आहे. संसर्ग रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे. कोरोना लशीच्या दोन डोसनंतर तिसरा डोस देण्याची ही योग्य वेळ आहे. बहुतेक लोक इम्युनोलॉजीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भारत बायोटेकने ती मिळवली आहे. लवकरच Covishield आणि Covaxin लवकरच बाजारात देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-19 लसी (Anti Covid-19 vaccines) लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता हे. याची किंमत प्रति डोस 275 रुपये असण्याची शक्यता आहे आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकतात. हे वाचा - धोकादायक..! Omicron नंतर नवा Corona Virus, चिनी शास्त्रज्ञांनी दिला इशारा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (National Pharmaceutical Pricing Authority, NPPA) ला लसींना आर्थिकदृष्ट्या कमी किंमतीत बनवण्यासाठी लसींच्या किंमती मर्यादित करण्याच्या दिशेनं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.Drugs Controller General of India (DCGI) gives permission to BharatBiotech for intranasal booster dose trials. #COVID19 pic.twitter.com/b2NEo5utfQ
— ANI (@ANI) January 28, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus