Home /News /videsh /

अवघ्या 2 वर्षांचा रिअल हिरो! कोरोना झालेल्या पालकांसह चिमुकल्याने 4 भावंडांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं

अवघ्या 2 वर्षांचा रिअल हिरो! कोरोना झालेल्या पालकांसह चिमुकल्याने 4 भावंडांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं

फोटो सौजन्य - गूड मॉर्निंग अमेरिका

फोटो सौजन्य - गूड मॉर्निंग अमेरिका

2 वर्षांच्या धाडसी चिमुकल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचवला आहे.

    वॉशिंग्टन, 28 जानेवारी : पहाटेचे 4.30 वाजले होतं. संपूर्ण कुटुंब साखर झोपेत होतं. एका भयानक संकटाच्या रूपाने यमराज घरात आला होता. कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं. पण अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दारातून खेचून बाहेर काढलं. 2 वर्षांच्या मुलाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीव वाचवला आहे (2 year old son saved family). वय अवघं दोन वर्षे, या वयात मुलांना स्वतःचा तोलही नीट सांभाळता येत नसतो. चालता चालता ती पडतात. त्यांना स्पष्ट बोलतानाही येत नसतं. असं असताना एवढासा चिमुरडा कुणाचा जीव कसा काय वाचवू शकतो. असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल नाही का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अमेरिकेतल्या टेक्सामध्ये प्रत्यक्षात घडलेली घटना आहे (2 year old son saved family from fire). 33 वर्षांचा नाथन आणि 28 वर्षांची कायला डाहल हे कपल गाढ झोपेत होतं. इतक्या त्यांच्या घरात आग लागली. पाहता पाहता घराला आगीने आपल्या विळख्यात घेतलं. फायर अलार्मही वाजला नाही. घर आगीच्या धुराने भरलं होतं, वासही येत होता. पण तरी नाथन, कायला जाग आली नाही आणि याचं कारण म्हणजे कोरोनाव्हायरसमुळे त्यांनी आपली वास आणि चव घेण्याची क्षमता गमावली होती. हे वाचा - 'एका वर्षातच 4 वेळा कोरोनाने गाठलं आणि आता...', तरुणीने सांगितला शॉकिंग अनुभव त्यांचा 2 वर्षांचा मुलगा ब्रँडन लिव्हिंग रूममध्ये झोपला होता. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे त्याला जाग आली. तो धावत आपल्या पालकांकडे गेला. गूड मॉर्निंग अमेरिका या वेबसाईटशी बोलताना कायलाने सांगितलं, तो माझ्या पायावर मारत होता आणि खोकत होता. आई गरम...आई गरम असं बोलत होता. मी पाहते तर काय घराचा दरवाजा आगीने पेटला होता. तेव्हा तिची झोपच होती. दोघं नवरा-बायको खडबडून उठले. आपल्या पाचही मुलांना त्यांनी घेतलं आणि आग लागलेल्या घरातून बाहेर पडले. नाथनने सांगितलं, आमच्याकडे काही सेकंदच होते. घरातून बाहेर पडताच एका मिनिटात आमच्या डोळ्यादेखत दरवाजातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होता. सर्वकाही आगीच्या विळख्यात सापडलं होतं. हे वाचा - दरूदरून घाम फुटला, किंचाळत पळाला; कित्येक वर्षे बंद घरात जाताच तरुणाची हवा टाईट घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. पण माझ्या मुलाच्या धाडसाचं कौतुक करायला हवं. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याने वाचवलं. तो आमचा छोटा मिनी हिरो आहे, असं कायला म्हणाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Fire, Parents and child

    पुढील बातम्या