JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Symptoms Of Omicron: आहारासंबंधित ही 2 लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा अलर्ट! असू शकतो ओमिक्रॉनचा धोका

Symptoms Of Omicron: आहारासंबंधित ही 2 लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा अलर्ट! असू शकतो ओमिक्रॉनचा धोका

संशोधकांनी ओमिक्रॉनच्या ज्या दोन लक्षणांचा उल्लेख केलाय ती आहाराशी संबंधित असू शकतात, ज्यात भूक न लागणं आणि वारंवार जेवण स्किप (Skip) करणं यांचा समावेश आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: गेल्या दोन महिन्यांपासून अनेक लोक कोरोना व्हायरसचा (Coronavirus new variant omicron) नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडले असून, अजूनही लोकांना या व्हेरियंटचा संसर्ग होत आहे. 24 नोव्हेंबरला पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनने बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर या व्हेरियंटचा जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झाल्याचं दिसून आलं. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) याला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ असं घोषित केलं. परंतु, डेल्टा व्हेरियंटच्या (Delta Variant) तुलनेत ओमिक्रॉन तितकासा धोकादायक आणि प्राणघातक नसल्याचं सिद्ध झालं असलं तरी त्याची लक्षणं (Omicron Symptoms) डेल्टाशी मिळतीजुळती आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झपाट्यानं होत आहे, परंतु, याचे बहुतांश रुग्ण घरीही बरे होत आहेत. लक्षणांबाबत बोलायचं झालं तर, याची अशी अनेक लक्षणं दिसून आली आहेत की ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये थकवा (Weakness), डोकेदुखी (Headache) यासारखी लक्षणं अधिक दिसून आली आहेत. परंतु, दोन लक्षणं अशीही आहेत की ज्याकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे. हे वाचा- कोरोना संसर्ग दीर्घ काळ राहिल्यास गंभीर धोका, Heart Beat वर होऊ शकतो मोठा परिणाम ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये दिसणारी दोन असामान्य लक्षणं TOI च्या वृत्तानुसार, युकेमध्ये झालेल्या संशोधनादरम्यान, संशोधकांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अतिसार, ओटीपोटात दुखणं यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून आलं. आतापर्यंतच्या क्लासिक कोविड-19 (Covid-19) च्या लक्षणांमध्ये ताप, थकवा, घसा खवखवणं आणि वास तसेच चव कमी होणं यांचा समावेश आहे, परंतु, ओमिक्रॉनची लक्षणं थोडी वेगळी आहेत. संशोधकांनी ओमिक्रॉनच्या ज्या दोन लक्षणांचा उल्लेख केलाय ती आहाराशी संबंधित असू शकतात, ज्यात भूक न लागणं आणि वारंवार जेवण स्किप (Skip) करणं यांचा समावेश आहे. खरंतर, जेवण स्किप करणं हे काही मोठ्या चिंतेचं कारण नाही, पण वारंवार असं होत असेल तर संबंधित व्यक्तीनं वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भुकेकडे कधीही दुर्लक्ष केलं जाऊ नये, कारण हे ओमिक्रॉनच्या लक्षणांव्यतिरिक्त इतर काही रोगांचेही संकेत असू शकतात. भूक कमी झाल्यास किंवा भूक लागत नसल्यास पुरेशा प्रमाणात द्रवरूप पदार्थ (Liquid) घेणं आवश्यक आहे. जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही आणि तुमचे शरीर संसर्गाशी लढू शकेल. हे वाचा- आपल्याला कोविडची लागण झालीच तर घरच्या-घरी करा हे 5 श्वसनाचे व्यायाम ही आहेत ओमिक्रॉनची सर्वसामान्य लक्षणं जर एखाद्या व्यक्तीला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर त्या व्यक्तीत खालील लक्षणं दिसू लागतात. - अंगदुखी - हलका ताप येणं - घसा खवखवणं - नाक वाहणं - डोकेदुखी - रात्रीच्या वेळी घाम सुटणं - उलट्या आणि मळमळ होणं त्यामुळे अशी लक्षणं दिसली तर सावध रहा आणि वेळीच डॉक्टरांकडे जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या