हैदराबाद, 12 जानेवारी : भारतात कोरोना लशीचा बुस्टर डोस (Corona vaccine Booster dose) द्यायला सुरुवात झाली आहे. अशात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कोरोना हा डोस सध्या थैमान घालणाऱ्या ओमिक्रॉनवर किती प्रभावी ठरेल. याबाबतच आता भारत बायोटेकने (Bharat Biotech) आपल्या कोवॅक्सिन लशीच्या बुस्टर (COVAXIN Booster dose) डोसबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. कोवॅक्सिनच्या (BBV152) बुस्टर डोस मोठा परिणाम दिसून आला आहे. विशेषतः ओमिक्रॉनवर याचा कसा परिणाम होतो आहे, याबाबतही कंपनीने माहिती दिली. कोवॅक्सिन लस तयार करणारी हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीने बुस्टर डोसचं संशोधन जारी केलं आहे. कोरोना लशीचा बुस्टर डोस घेतलेल्यांच्या शरीरातील सेरा घेऊन त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये बुस्टर डोस कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टाविरोधात (Delta) प्रभावी ठरत असल्याचा दिसून आला आहे.
लवकरच हे संशोधन medRXiv वर पब्लिश केला जाणार आहे. याआधी कोवॅक्सिन अल्फा, बिटा, डेल्टा, झेटा आणि कप्पाल व्हेरिएंटवरही प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा - ओमायक्रॉनची लक्षणे काय? संसर्ग झालाय हे कसं ओळखाल? वाचा तज्ज्ञांचं मत एमोरी वॅक्सिन सेंटरचे सहाय्यक प्राध्यापक मेहुल सुथार यांनी सांगितलं, “ओमिक्रॉनमुळे सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. प्राथमिक अहवालानुसार कोरोना लशीचा बुस्टर डोस घेणाऱ्यामध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटविरोधात चांगला परिणाम पाहायला मिळाला. बुस्टर डोस आजाराची तीव्रता कमी करतो आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ ओढावत नाही, हेच या ससोधनातून दिसून आलं” तर भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, “प्रौढ आणि लहान मुलांसाठी जगात वापरली जाणारी अशी लस निर्माण कऱण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य झाल्याचं दिसतं आहे” हे वाचा - उंदरांपासून विकसित झाला ओमायक्रॉन व्हेरिएंट? संशोधकांच्या दाव्याने वाढवली चिंता भारतात 10 जानेवारीपासूनच कोरोना लशीचे बुस्टर डोस दिले जात आहेत. याला प्रिकॉशन डोस असं म्हटलं जातं आहे. हा डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आजारी लोकांना दिला जातो आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलेल्या अंदाजानुसार 1.05 कोटी आरोग्य कर्मचारी, 1.9 कोटी फ्रंटलाइन कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 2.75 कोटी लोकांना या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक डोस दिले जातील. तसंच हीच लस 15 ते 18 वयोगटातील मुलांनीही दिली जाते आहे.