मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

उंदरांपासून विकसित झालाय कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट? चिनी संशोधकांच्या दाव्याने वाढवली चिंता

उंदरांपासून विकसित झालाय कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट? चिनी संशोधकांच्या दाव्याने वाढवली चिंता

चिनी शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार, सार्स कोव्ह -2 (Sars-CoV-2) विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिएंट उंदरांमध्ये विकसित होऊन मानवांमध्ये येऊ शकतो.

चिनी शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार, सार्स कोव्ह -2 (Sars-CoV-2) विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिएंट उंदरांमध्ये विकसित होऊन मानवांमध्ये येऊ शकतो.

चिनी शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार, सार्स कोव्ह -2 (Sars-CoV-2) विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिएंट उंदरांमध्ये विकसित होऊन मानवांमध्ये येऊ शकतो.

नवी दिल्ली 12 जानेवारी : जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pandemic) संकट पुन्हा गडद होत आहे. कोरोना व्हायरसच्या 'ओमायक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरत आहे. ओमायक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमायक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला ओमायक्रॉनचा प्रसार भारतातदेखील झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत हजारो रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यापैकी दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळं केंद्र सरकारनं (Central Government) सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये निर्बंध (Covid restriction) लावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ओमायक्रॉनबाबत सुरू असलेल्या रिसर्चमधून समोर आलेल्या एका नवीन शक्यतेमुळं संशोधकांची चिंता आणखी वाढली आहे. 5 वर्षापूर्वी अपघातात गमावला आवाज; कोरोनाची ही लस घेताच पुन्हा फाडफाड बोलू लागला ओमायक्रॉनची उत्पत्ती कशी झाली याबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलेलं आहे. त्यातून तीन शक्यता समोर आल्या आहेत. ओमायक्रॉन जेनोम टेस्टमुळं मानवामध्ये पसरला आहे, दीर्घकाळ संसर्ग असलेल्या इम्युनो-कॉम्प्रमाईज्ड पेशंटमध्ये म्युटेशन होऊन त्याची निर्मिती झाली आहे किंवा ओमायक्रॉन हे एक रिव्हर्स झूनोसिस (zoonosis) प्रॉडक्ट आहे. म्हणजेच सर्वात अगोदर प्राण्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आणि नंतर त्यानं माणसाच्या शरीरात प्रवेश केलेला आहे. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या (Chinese Academy of Sciences) शास्त्रज्ञांनी रिव्हर्स झूनोसिसला ओमायक्रॉनच्या उत्पत्तीचं कारणं मानलं आहे. चिनी शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार, सार्स कोव्ह -2 (Sars-CoV-2) विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरिएंट उंदरांमध्ये विकसित होऊन मानवांमध्ये येऊ शकतो. हिंदुस्थान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, इम्युनो-कॉम्प्रमाईज्ड पेशंटमध्ये म्युटेशन होऊन ओमायक्रॉनची निर्मिती झाली आहे, या शक्यतेच्या बाजूनं सध्या अनेक शास्त्रज्ञ आहेत. यामध्ये कमीतकमी व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (variant of concern -VOC) असल्यानं शास्त्रज्ञांचं असं मत झालं आहे. मात्र, जर्नल ऑफ जेनेटिक्स अँड जीनोमिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या चिनी शास्त्रज्ञांच्या अहवालात तिसऱ्या शक्यतेवर (रिव्हर्स झूनोसिस) जास्त भर देण्यात आला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी केलेल्या कॅलक्युलेशननुसार, कोरोना व्हायरसचं साधारणपणे एका महिन्यात 0.45 इतक्या दरानं म्युटेशन होतं. ज्यामध्ये इतर सर्व व्हिओसींचा समावेश होतो. पण, ओमायक्रॉनचं म्युटेशन तिप्पट वेगाने झालं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंटमधील म्युटेशनचं आण्विक स्वरूप (molecular nature of mutations) मानवांमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाविषाणूसारखं नाही. हे म्युटेशन प्राण्यांमधील आणि विशेषत: उंदरांमधील व्हायरस म्युटेशनसारखं आहे. याशिवाय शास्त्रज्ञांना ओमायक्रॉन आणि दोन B. 1.1 फॅमिली व्हायरस यांच्यामध्ये जवळचा संबंध आढळला आहे. B.1.1 मे 2020 मध्ये शेवटचा आढळला होता. तेव्हा त्यातील म्युटेशन एक्सपेक्टेड लाईन्सवर होतं. याचा अर्थ असा होतो की, उंदरांना संक्रमित करण्यासाठी सक्षम होण्यात Sars-CoV-2 नं लक्षणीय झेप घेतली आहे. Corona Alert ताप, सर्दी-खोकल्याखेरीज कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ही नवी लक्षणं शास्त्रज्ञांच्या निष्कर्षांवरून असं निदर्शनास येतं की, ओमायक्रॉनच्या पूर्वज विषाणूनं साथरोगाच्या (2020 च्या मध्यात) काळात रिव्हर्स झुनोटिक अनुभवलं आहे आणि आता 2021च्या उत्तरार्धात तो पुन्हा माणसांमध्ये परत आला आहे. यापूर्वी तो एक वर्षापेक्षा जास्त काळ अॅक्युम्युलेटेड म्युटेशन (accumulated mutations) स्थितीमध्ये उंदरांमध्ये राहिला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी, संशोधनाच्या आधारवर व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्यास येत्या काळात ओमायक्रॉनचा प्रसार प्रचंड वेगानं होण्याची भीती निर्माण झाली आहे.
First published:

Tags: Corona spread, Corona updates

पुढील बातम्या