वॉशिंग्टन, 05 फेब्रुवारी: कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) बरेच दुष्परिणाम समोर आले आहेत. कोरोनातून बरं झाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कोरोनावर मात केलेल्यांमध्ये पोस्ट कोविड लक्षणं दिसून येत आहेत. कुणाला डोकेदुखी, कुणाला अशक्तपणा, कुणाला थकवा अशा समस्यांचा सामान्यपणे समावेश आहे. पण एका व्यक्तीवर कोरोना संसर्गाचा असा भयंकर परिणाम झाला आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टच फुटला आहे. अमेरिकेतील 72 वर्षीय व्यक्ती कोरोनाने संक्रमित झाली. कोरोनावर तिने मातही केली. पण आता कोरोनाच्या अतिशय दुर्मिळ आणि भयंकर दुष्परिणामाचा सामना करावा लागला (Coronavirus side effects). युरोलॉजी केस स्टडीजमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. न्यूज ट्रॅक लाइव्ह च्या रिपोर्टनुसार या व्यक्तीला Pyoderma Gangrenosum (PG) झाल्याचं निदान झालं. एक वेदनादायी स्थिती आहे. त्याच्या त्वचेवर मोठं स्किन अल्सर तयार झाले. त्याच्या टेस्टिकल्सवरील (Testicle) त्वचेला अल्सर पडले. त्याच्या टेस्टिकल्सवरील बाहेरील त्वचा पूर्णपणे नष्ट झाली. त्याचा प्रायव्हेट पार्ट फुटला. हे वाचा - Alert! प्राण्यांतही पसरतोय कोरोना, कुत्र्यामध्ये लक्षणं; मोठ्या संकटाचे संकेत नोवा साउथ ईस्टर्न यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ एलोपॅथिक मेडिसीनचेप्रमुख लेखक मशुटा हसन यांंनी सांगितलं की, कोरोनामुळे त्वचेसंबंधी आणि अवयवातंर्गत सूज येण्याच्या समस्या बळावत आहे, अशी बरीच प्रकरणं आहेत. Mashuta Hasan यांनी सांगितलं, कोरोना संक्रमणानंतर Pyoderma Gangrenosum आणि त्यानंतर त्यामुळे होणाऱ्या Genital Ulcers बाबत आम्हाला समजलं. रुग्णाच्या टेस्टिकल्सची बाह्यत्वचा पूर्णपणे खराब झाली होती. बऱ्याच कालावधीच्या उपचारानंतर त्याच्या टेस्टिकल्सवरील जखम बरी झाली आहे. आता त्याला टॉयलेटला जाण्यातही काही त्रास होत नाही. कोरोनामुळे प्रायव्हेट पार्ट झाला लहान याआधी अमेरिकेतीलच एका 30 वर्षीय व्यक्तीने कोरोनानंतर आपला प्रायव्हेट पार्ट लहान झाल्याचा दावा केला होता. मागील वर्षी जुलै महिन्यात त्याला कोरोना झाला होता. उपचारानंतर तो घरी आला तेव्हा आधीच्या तुलनेच त्याच्या प्रायव्हेट पार्टचा आकार लहान झाल्याचं त्याला दिसलं. कोरोनातून बरं झाल्यानंतर मला इरेक्टाईल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) झाल्याचं त्याने सांगितलं. मिररच्या रिपोर्टनुसार, पॉडकास्टवर या व्यक्तीने आफली व्यथा मांडली होती. याबाबत पॉडकास्टमध्ये बोलताना यूएस यूरोलॉजिस्ट एशले विंटर एमडी म्हणाले, हे कोरोनाचं एक अतिशय दुर्मिळ लक्षण आहे. जे प्रायव्हेट पार्टच्या रक्तप्रवाहाला प्रभावित करतं. हेच नंतर इरेक्टाइल डिस्फंक्शनचं कारण बनू शकतं. इरेक्टाईल डिस्फंक्शमुळे प्रायव्हेट पार्टचा आकार लहान होतो. हे वाचा - जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार कोरोनातून पूर्णपणे बरं झालेल्या दोन पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हायरसचे ट्रेसेस आढळले, ज्यामुळे त्यांचं खासगी आयुष्य प्रभावित झालं. नंतर त्यांनी Implant Surgeries कराव्या लागल्या, असंही डॉ. विंटर यांनी सांगितलं.