मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Alert! आता प्राण्यांमध्येही पसरतोय Coronavirus, कुत्र्यामध्ये दिसली लक्षणं; तज्ज्ञ म्हणाले, 'मोठ्या संकटाचे संकेत'

Alert! आता प्राण्यांमध्येही पसरतोय Coronavirus, कुत्र्यामध्ये दिसली लक्षणं; तज्ज्ञ म्हणाले, 'मोठ्या संकटाचे संकेत'

कुत्र्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

कुत्र्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

कुत्र्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 05 फेब्रुवारी: कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स थैमान घालत आहेत. आता कुठे परिस्थिती सामान्य होत असताना आता आणखी एका आजाराचं संकट उभं येऊ ठाकलं आहे. माणसांनंतर आता पाळीव कुत्रामध्येही कोरोनाव्हायरसची लक्षणं सापडली आहे. तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांमध्ये कोविड पसरला तर मोठा धोका उद्भवू शकतो (Coronavirus in dog). कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी माणसं आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात. त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या नियमांचं पालन करू शकतात. पण जरा विचार करा, मुके जीव त्यांना असे नियम, कायदे समजावणं आणि त्यांचं पालन करायला लावणं अशक्य आहे, त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरस संसर्ग पसरला तर काय होईल?  त्यामुळेच यूकेतील यॉर्कशायरमध्ये पाळीव कुत्र्यामध्ये कोरोनाव्हायरसची (Coronavirus)  लक्षणं दिसल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जर प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमण पसरलं तर जगाला पुन्हा एका संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हे वाचा - जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार यॉर्कशायर लाइव्हच्या रिपोर्टनुसार, यॉर्कशायरध्ये समुद्रकिनारी जाणाऱ्या प्राण्यांमध्ये अशी लक्षणं आढळली आहेत. ज्यामध्ये पाळीव कुत्रेही गंभीर आजाराने ग्रस्त झाले आहेत.  कुत्र्यांना एका अज्ञात आजाराने आपल्या विळख्यात घेतलं आहे. या आजाराची लक्षणं पाहता ज्याची भीती होती, त्याच धोक्याचे हे संकेत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. प्राण्यांच्या संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांच्या मते, पाळीवर प्राण्यांमध्ये संसर्गाची आलेली अचानक लाट यामागे खतरनाक कोरोनाव्हायरस असू शकतो. लिव्हरपूल युनिव्हर्सिटीतील पशूतज्ज्ञ प्रोफेसर एलन रेडफोर्ड (Prof. Alan Radford) कुत्र्यांमध्ये होणाऱ्या या आजाराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रो. एलन स्मॉल अॅनिमल वेटरनरी सर्विलान्स नेटवर्कच्या (SAVSNET) नेतृत्वातील एका तज्ज्ञ टीमचे सदस्य आहेत. ज्यांनी याबाबतचा नवा डेटा जारी केला आहे. त्यानुसार यॉर्कशायरमध्ये तीन आठवड्यांत आजारी प्राण्यांची संख्या अपेक्षेपेक्षा वाढली आहे आणि एका नव्या संकटाकडे इशारा करत आहे. या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. हे वाचा - Shocking! HIV रुग्णाच्या शरीरातच कोरोनामध्ये 21 बदल; संशोधकांनी व्यक्त केली भीती तज्ज्ञांच्या मते हा एक कॅनाइन अँटिरक कोरोनाव्हायरस (सीईसी) असू शकतो. CEC चा SARS-CoV-2 शी काहीही संबंध नाही. त्यामुळे हा व्हायरस प्राण्यांमार्फत माणसांमध्ये पसरू शकत नाही. त्यामुळे या आजाराने संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्यास माणासांना त्याचा धोका नाही. पण तरी अद्याप याबाबत अभ्यास सुरू आहे. त्यामुळे पाळीव कुत्र्यांच्या मालकांना पशू तज्ज्ञांच्या संपर्कात राहण्याचा आणि प्राण्यांना इतर प्राण्यांच्या संपर्कात न येऊ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Dog, International, Lifestyle, London, Pet animal

पुढील बातम्या