जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार

जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार

जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार

Corona Positive Effect: 25 वर्षीय नॅन्सी सिम्पसनला आयुष्यभर पश्चात्ताप होत होता की तिला कशाचाही वास येत नाही. नॅन्सीमध्ये जन्मापासूनच वास घेण्याची क्षमता नव्हती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 फेब्रुवारी : माणसाच्या शरीरातील अगदी छोट्या छोट्या अवयवांनाही मोठं महत्त्व असतं. निसर्गाने निर्माण केलेल्या कोणत्याही शरीराच्या संरचनेला तुम्ही निरर्थक ठरवू शकत नाही. वास घेण्याच्या शक्तीचंदेखील एक महत्त्वाचं काम आहे. सर्दी झाल्यावर खाण्यापिण्याच्या आवडत्या गोष्टींचा वास येत नाही तेव्हा त्याचं महत्त्व कळतं. कोरोना बाधित रुग्णांमध्ये कशाचाही वास येणं बंद होणं हे देखील एक प्रमुख लक्षण आहे. पण इंग्लंडमधील एका महिलेला जन्मापासूनच कशाचाही वास येत नव्हता. सिंगल डोस कोरोना लशीचा मार्ग मोकळा; Sputnik light ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल लंडनमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय नॅन्सी सिम्पसनला आयुष्यभर पश्चात्ताप होत होता की तिला कशाचाही वास येत नाही. नॅन्सीमध्ये जन्मापासूनच वास घेण्याची क्षमता नव्हती. तिला फुलं, अन्न, अत्तर अशा कोणत्याही गोष्टीच्या वासाची कल्पना नव्हती. पण कोरोनाव्हायरसचा तिच्यावर सकारात्मक परिणाम झाला (Positive Effect of Coronavirus). ज्या महामारीने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं, तिनेच नॅन्सीचं आयुष्य सुरळित केलं (Woman Able to Smell after Recovering from Coronavirus). डिसेंबर 2021 मध्ये ख्रिसमसच्या वेळी नॅन्सी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं. तब्येतीत सुधारणा होत असताना एक दिवशी तिच्या लक्षात आलं की तिला प्रत्येक गोष्टीचा वास येऊ लागला आहे. द सन वेबसाईटशी बोलताना नॅन्सी म्हणाली की, पूर्वी तिला जेवणाची चव माहिती असायची पण वास येत नव्हता. मात्र कोरोनाची लागण झाल्यानंतर अन्नाचा वासही नॅन्सीला सहज येऊ लागला. Corona मृत्यू कमी करण्यासाठी Lockdown प्रभावी नाही? अभ्यासक म्हणाले… ती म्हणाली की लोकांसाठी ही अगदी क्षुल्लक गोष्ट असेल पण माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. 25 वर्षे तिला कशाचाही वास आला नव्हता. आता तिला वास येऊ लागल्याने तिने आपलं घर फुलांनी सजवलं आहे. ती रोज भरपूर परफ्यूमही लावते. यापूर्वी ती सॅल्मन खात नव्हती, पण त्याचा वास आल्यानंतर तिनेही सॅल्मन खाण्यास सुरुवात केली आहे. आता तिला फुलं, फळं आणि मेणबत्तीचा वास घ्यायला खूप आवडतं. तिला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आता ती प्रत्येक गोष्टीचा वास घेऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात