JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Success Story: वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण; एकाच कुटुंबातील चारही बहीण भावांची पोलीस दलात निवड

Success Story: वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण; एकाच कुटुंबातील चारही बहीण भावांची पोलीस दलात निवड

आज आम्ही तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगणार आहोत त्यांचं स्वप्नं त्यांच्या मुलांनी पूर्ण केलं आहे. एकाच कुटुंबातील चारही बहीण भावांची पोलीस दलात निवड झाली आहे.

जाहिरात

नक्की कोण आहे हे कुटुंब जाणून घेऊया.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल: महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेच्या लेखी आणि शारीरिक परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील हजारो तरुणांची निवड झाली आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगणार आहोत त्यांचं स्वप्नं त्यांच्या मुलांनी पूर्ण केलं आहे. एकाच कुटुंबातील चारही बहीण भावांची पोलीस दलात निवड झाली आहे. नक्की कोण आहे हे कुटुंब जाणून घेऊया.

जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावातील शेतकरी कुटुंबातील चार मुलांची पुणे शहर आणि रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करावी, असे विजय गाडेकर यांचे स्वप्न होते. राज्याच्या महिला बालविकास विभागात भरतीची मोठी घोषणा; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका; करा अर्ज 2011 मध्ये सारिका गाडेकर, 2014 मध्ये आशा गाडेकर आणि 2023 मध्ये दीपक गाडेकर आणि अंकिता गाडेकर यांची महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल 30 लाख लोकांच्या मृत्यूचा दोषी; 6वी पास पंतप्रधान जो होता भारताच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वात मोठा अडथळा या चारही भावंडांना शालेय जीवनाच्या सुरुवातीपासूनच शिकण्याची उत्सुकता होती. त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद येथे झाले आणि उच्च शिक्षण आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात पूर्ण केले. या चारही भावंडांना सह्याद्री करिअर अॅकॅडमीचे अनिकेत घोडेकर यांनी मार्गदर्शन केले. CRPF Recruitment: महिन्याचा तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि देशसेवेची मोठी संधी; 212 जागांसाठी भरतीची घोषणा तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि विविध परीक्षा पूर्ण करून चारही भावंड महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले आहेत. चारही भावंडांनी हे यश मिळविल्याबद्दल तालुका व वडगाव आनंद ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या