JOIN US
मराठी बातम्या / करिअर / पत्रकारांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग Oxford युनिव्हर्सिटीत जर्नालिस्ट फेलोशिप करा ना; ही घ्या माहिती

पत्रकारांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग Oxford युनिव्हर्सिटीत जर्नालिस्ट फेलोशिप करा ना; ही घ्या माहिती

तुम्हाला थेट परदेशात जाऊन पत्रकारितेचं अधिक शिक्षण घ्यायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कारण….

जाहिरात

ही घ्या माहिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल: लोकशाहीचा चौथा आणि भक्कम स्तंभ म्हणून पत्रकारितेला नेहमीच भारतात मान आहे. त्यामुळेच बारावीनंतर अनेक तरुण-तरुणी पत्रकार होण्याचं स्वप्न बघतात. त्यानुसार आपलं ग्रॅज्युएशनही पूर्ण करतात आणि एका चांगल्या न्यूज कंपनीला जॉईन होतात. पत्रकारितेचे सर्व बारकावे इथे शिकतात आणि अनुभवही घेतात. मात्र एका पत्रकाराने सतत शिकत राहावं असं म्हणतात. तसेच काही पत्रकार अनुभव आल्यानंतर सुद्धा थांबत नाहीत आणि शिक्षण घेत असतात. जर तुम्हीही पत्रकार असाल आणि तुम्हाला थेट परदेशात जाऊन पत्रकारितेचं अधिक शिक्षण घ्यायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एका फेलोशिपबद्दल सांगणार आहोत जी करून तुम्ही संपूर्ण जगात पत्रकार म्हणून नावलौकिक मिळवू शकता. हो. आम्ही बोलत आहोत पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठित मानली जाणारी ‘रॉयटर्स-ऑक्सफर्ड जर्नालिस्ट फेलोशिप’ बद्दल. ही फेलोशिप रॉयटर्स इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी डिझाईन केली आहे. जगभरातील पत्रकारांसाठी ही फेलोशिप आहे. जे पत्रकार वरिष्ठ आहेत किंवा ज्यांना पत्रकारितेत येऊन काही वर्षांचा अनुभव आहे अशा सर्व पत्रकारांना ही फेलोशिप दिली जाते. पण यासाठी नक्की कोण पात्र असतात? आणि या फेलोशिपमध्ये नक्की किती मानधन दिलं जातं? हे जाणून घेऊया.

या फेलोशिपची वैशिट्ये या ‘रॉयटर्स-ऑक्सफर्ड जर्नालिस्ट फेलोशिप’ साठी जगभरातील केवळ 30 पत्रकारांना संधी देण्यात येते.निरनिराळ्या देशांमधून आलेल्या पत्रकारांना या फेलोशिपमध्ये आपले अनुभव आणि आयडिया एकमेकांसोबत शेअर करण्याची संधी मिळते. तसंच पत्रकारितेतील चॅलेन्जेस एकमेकांसमोर मांडण्याचा चान्स मिळतो. इतकंच नाही तर तुम्हाला प्रसिद्ध अशा काही मोठ्या न्यूज फर्म्सला भेट देण्याची संधीही मिळते. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा फेलोशिप फंडेड असते का? कार्यक्रमातील बहुतेक पत्रकारांना पूर्णपणे निधी दिला जातो. यशस्वी अर्जदारांना त्यांची फी कव्हर केली जाते आणि त्यांना £2,000 चा मासिक स्टायपेंड मिळतो, जो निवास, भोजन आणि सामान्य राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा असतो. अरे याला जिद्द म्हणावी की काय? 1962 पासून तब्बल 56 वेळा दिली 10वीची परीक्षा; 57व्या वेळी झाले पास कोण करू शकतात अर्ज? पत्रकार फेलोशिपसाठी, तुमच्याकडे किमान पाच वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असणं आवश्यक आहे. किंवा क्वचित प्रसंगी समतुल्य कौशल्याचे प्रदर्शन केले पाहिजे. फ्रीलान्सिंग हा अनुप्रयोगासाठी अडथळा नाही, परंतु सार्वजनिक व्यवहार, जनसंपर्क किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन्समध्ये काम करणारे यासाठी एलिजिबल नसतात. इंग्रजी भाषेच्या प्रवीणतेची चाचणी घेतली जात नाही, परंतु तुम्ही इंग्रजीमध्ये समजून घेण्यास आणि चर्चेत सामील होण्यास सक्षम असणं आवश्यक आहे. इथे एक परीक्षाही होत नाही क्रॅक; 21 वर्षांच्या नताशानं केली कमाल; एकाच वेळी टॉप केल्या 4 स्पर्धा परीक्षा जर तुम्हालाही या फेलोशिपसाठी आपली करण्याची इच्छा असेल तर तुम्ही https://reutersinstitute.politics.ox.ac.uk/how-apply-our-fellowship-programme या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता. तसंच या प्रोग्रॅमसाठी कसं अप्लाय करायचं हे ही जाणून घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या