जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा

चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा

या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा

या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा

एसपी मृदृल कच्छावा यांच्या कामगिरीकडे बघितल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यांनी चंबळच्या दऱ्या-खोऱ्यांतून दरोडेखोरांचा खात्मा केला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 एप्रिल: आयपीएस अधिकारी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि रिस्क घेण्याची तयारी असावी लागते. संवेदनशील परिसरांतील अधिकाऱ्यांना तर प्रसंगी जीवाचीही बाजी लावावी लागते. अशा गोष्टी आपण सिंघमसारख्या चित्रपटांमध्ये बघितल्या असतील. प्रत्यक्षात अशी परिस्थिती असते की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात चित्रपट बघितल्यानंतर आला असेल. एसपी मृदृल कच्छावा यांच्या कामगिरीकडे बघितल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यांनी चंबळच्या दऱ्या-खोऱ्यांतून दरोडेखोरांचा खात्मा केला आहे. गुन्हेगार त्यांच्या नावानं थरथर कापतात, तर गावकरी त्यांचा आदर करतात. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मृदुल कच्छावा हे मूळचे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण बिकानेर येथे झालं. त्यानंतर त्यांनी केंद्रीय विद्यालय जयपूर येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि जयपूरमधील कॉमर्स कॉलेजमधून बी.कॉम केलं. बी. कॉम केल्यानंतर राजस्थान विद्यापीठातून त्यांनी एमआयबीची पदवी घेतली व सीए आणि सीएसचा अभ्यास केला. या दरम्यान त्यांनी नेट क्वालिफाय करून जर्मन बँकेत एक वर्ष काम केलं. बँकेत काम केल्यानंतर यूपीएससीच्या तयारीसाठी ते दिल्लीला गेले.

News18लोकमत
News18लोकमत

यूपीएससीची तयारी करण्यासाठी मृदुल कच्छावा अडीच वर्षे दिल्लीत राहिले. 2014 मध्ये भारतीय पोस्टल सेवेत त्यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयपीएस होण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. 2015 मध्ये आयपीएस म्हणून मृदुल यांची निवड झाली. आपलं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मृदुल यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी पंकज सिंह यांची मुलगी कनिकाशी लग्न केलं. जानेवारी 2017 ते जून 2017 या कालावधीत राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यात प्रोबेशनल एसपी म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर 2018 पर्यंत गंगानगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा दिली. गंगानगरनंतर कच्छावा यांना अजमेरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसपी म्हणून नियुक्ती मिळाली. जानेवारी 2019 ते जुलै 2019 या कालावधीत ते अजमेरमध्ये राहिले. अजमेरनंतर मृदुल कच्छावा यांना स्वतंत्रपणे ढोलपूर जिल्ह्याचे एसपी म्हणून चार्ज मिळाला. अरे याला जिद्द म्हणावी की काय? 1962 पासून तब्बल 56 वेळा दिली 10वीची परीक्षा; 57व्या वेळी झाले पास ढोलपूर जिल्ह्यातील चंबळचं खोरं अनेक दशकांपासून बंडखोर आणि दरोडेखोरांच्या नावानं कुप्रसिद्ध आहे. ‘एक मरे दो जावे, जाको वंश डूब ना पावे’ ही हिंदी म्हण चंबळमधील गुन्हेगार खरी करून दाखवतात. अनेक दशकांपूर्वी डाकिण फुलन देवी, डाकू मोहर सिंग, डाकू माधो सिंग, पुतळीबाई, डाकू मलखान, जगजीवन परिहार, पान सिंग यांच्यासह डझनभराहून अधिक दरोडेखोरांनी देशाच्या कानाकोपऱ्यात चंबळचं नाव पोहचवण्याचं काम केलं होतं. इथे एक परीक्षाही होत नाही क्रॅक; 21 वर्षांच्या नताशानं केली कमाल; एकाच वेळी टॉप केल्या 4 स्पर्धा परीक्षा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं असल्यानं चंबळचं खोरं दरोडेखोरांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं जातं. बदलत्या काळानुसार दरोडेखोरांच्या कार्यशैलीत आणि गुन्हेगारीच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. या ठिकाणी सुरुवातीपासूनच मृदुल कच्छावा यांनी गुन्हेगारांचा खात्मा करण्याची मोहीम हाती घेतली. त्यांनी आपल्या अल्प कार्यकाळात चंबळमधील 57 दरोडेखोरांना पकडून तुरुंगात टाकलं. तरुण आणि उत्साही आयपीएस मृदुल कच्छावा यांनी आधुनिक तंत्राचा पुरेपूर फायदा घेतला. चंबळच्या खोऱ्यांमधून दरोडेखोर आणि बदमाशांचा नायनाट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चंबळचं खोरं गुन्हेगार मुक्त करणं, हे धोलपूर पोलिसांचं मोठे यश मानलं जातं. काही वर्षांपूर्वी तत्कालीन एसपी राहुल प्रकाश आणि विकास कुमार यांनीही पुढाकार घेऊन अनेक गुन्हेगार पकडले होते. मात्र, गुन्हेगारी सुरूच होती. जुलै 2019 पासून एसपी मृदुल कच्छावा यांनी 57 दरोडेखोर आणि कट्टर गुन्हेगारांना तुरुंगात टाकलं आहे. ज्यामध्ये जगन गुर्जरचा लहान भाऊ पप्पू गुर्जर, लालसिंग गुर्जर, रामविलास गुर्जर, भरत गुर्जर, रामविलास गुर्जर आणि रघुराज गुर्जर यांचा समावेश आहे. Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क लॉकडाउन काळात एसपी कच्छावा यांनी 22 हून अधिक दरोडेखोरांना अटक केली. 11 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मृदुल आणि त्यांच्या टीमनं दरोडेखोरांची अटक मोहीम यशस्वी केली. एसपींच्या या यशामागे सुमारे डझनभर तरुण पोलीस निरीक्षक, डीएसटी टीम, आरएसी टीम आणि सायबर सेलची प्रमुख भूमिका मानली जात आहे. यासोबतच खबऱ्यांच्या नेटवर्कची फार मोठी मदत झाली. एसपींच्या या मोहिमेदरम्यान अनेकदा चकमकी झाल्या तर काही गुन्हेगार आत्मसमर्पणासाठी तयार झाले. प्रत्येक महिन्याला तब्बल 60,000 रुपये पगार तुमच्या खिशात; ‘या’ महापालिकेत परीक्षेशिवाय मिळेल जॉब एसपी मृदृल कच्छावा यांनी पकडलेले गुन्हेगार रामवीर गुर्जर, सुरेंद्र ठाकूर, जसवंत गुर्जर, विजेंदर उर्फ राम दुलारे, विनोद उर्फ बंटी पंडित, अनिल उर्फ गुड्डू ठाकूर, राजवीर गुर्जर, अजित उर्फ जीतू ठाकूर यांच्यासह एकूण 57 गुन्हेगारांना एसपी कच्छावा यांनी पकडलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात