मुंबई, 26 एप्रिल: शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती कोणतंही शिक्षण घेऊ शकतो. पण यासाठी लागते जिद्द आणि चिकाटी. पण आज आम्ही तुम्हाला ज्यांच्या विषयी सांगणार आहोत त्यांची जिद्द आणि दहावीची परीक्षा पास करण्याची इच्छा बघून भल्याभल्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. कोण आहेत हे ज्यांनी एक प्रकारचा पराक्रमच करून दाखवला आहे. आम्ही बोलत आहोत 77 वर्षांच्या हुकुमदास वैष्णव यांच्याबद्दल. त्यांनी वयाच्या बंधनात न अडकता बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सलग 57 वेळा दहावीची परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 56 वेळा अपयशी होऊनही त्यांनी हार मानली नाही आणि आपला आत्मा अबाधित ठेवला. आज यूपी बोर्डाच्या 56 लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले असताना 57 व्या वेळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राजस्थानच्या जालोर येथील हुकुमदास वैष्णव यांची कहाणी समोर आली आहे.
हुकुमदास म्हणतात की वाचायला किंवा शिकायला वय नसतं. हुकुम दास वैष्णव यांची कथाही अशीच आहे. वयाने ते वृद्ध असले तरी त्यांची अभ्यासाची आवड तरुणापेक्षा कमी नाही. 77 वर्षांचे हुकुमदास दोन विभागात काम करून निवृत्त झाले आहेत. पण कमी शिकलेले आहेत म्हणून त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्धार केला. या भावनेमुळे वयाच्या 77 व्या वर्षी हुकुमदास यांनी अखेर 57 व्या प्रयत्नात दहावी पूर्ण केली. इथे एक परीक्षाही होत नाही क्रॅक; 21 वर्षांच्या नताशानं केली कमाल; एकाच वेळी टॉप केल्या 4 स्पर्धा परीक्षा 10वीत नापास होण्याची प्रक्रिया 1962 सालापासून सुरू झाली जेव्हा हुकुम सिंग पहिल्यांदा परीक्षेत नापास झाले. हुकुमदास 2005 मध्ये वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले तेव्हा ते 10वीत 43 वेळा नापास झाले होते. परीक्षेत सतत नापास झाल्यामुळे हुकुमदासचे मित्र त्यांना दहावी पास झाले नाहीत म्हणून टोमणे मारायचे. हार न मानता हुकुमदास यांनी 2011 मध्ये स्टेट ओपनमध्ये प्रवेश घेतला. यानंतरही तो नापास होत राहिला पण 2019 मध्ये हुकुमदासने 56व्या प्रयत्नात 10वीची परीक्षा दिली. Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हुकुमदासला बारावीत शिक्षण पूर्ण करायचे आहे. यासाठी हुकुमदास वैष्णव यांनी जालोर येथील बारावी कला वर्गातून राज्य खुल्या स्पर्धेत नाव नोंदवले आहे.