JOIN US
मराठी बातम्या / करिअर / तुम्हाला क्षणात मालामाल बनवणारं चॅलेंज; ChatGPT मधील बग शोधा आणि व्हा लखपती; OpenAI चा खास प्रोग्रॅम

तुम्हाला क्षणात मालामाल बनवणारं चॅलेंज; ChatGPT मधील बग शोधा आणि व्हा लखपती; OpenAI चा खास प्रोग्रॅम

जे ग्राहक चॅटजीपीटी आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स सिस्टीममधील त्रुटी शोधून दाखवतील त्यांना 20,000 डॉलरपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे.

जाहिरात

ChatGPT मधील बग शोधा आणि व्हा लखपती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 एप्रिल: गेल्या काही महिन्यांपासून आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर आधारित असलेले चॅटजीपीटी जोरदार चर्चेत आहे. चॅटजीपीटीमुळे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. चॅटजीपीटीला युजर्सकडून चांगली पसंती मिळत असून, त्याचा वापरदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र इटलीत चॅटजीपीटीने गोपनीयतेचा उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ओपनएआय या चॅटबॉट कंपनीनं एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, जे ग्राहक चॅटजीपीटी आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स सिस्टीममधील त्रुटी शोधून दाखवतील त्यांना 20,000 डॉलरपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी ओपनएआयनं मंगळवारी बग बाउंटी प्रोग्रॅम सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. सामान्यपणे बग प्रोग्रॅम हा सॉफ्टवेअर किंवा आयटी तंत्रज्ञानातील त्रुटी शोधून काढण्यासाठी असतो. त्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि हॅकर्स भाग घेतात पण कंपनीने हा प्रोग्रॅम ग्राहकांसाठी असल्याचं म्हटलं आहे. `कंटेंट डॉट टेकगिग`ने याविषयी माहिती दिली आहे. ओपन एआय कंपनी तिच्या लोकप्रिय चॅटजीपीटी या चॅटबॉटसाठी ओळखली जाते. ओपनएआयच्या चॅटजीपीटीला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा सपोर्ट आहे. नोव्हेंबरमध्ये या कंपनीची स्थापना झाली. तेव्हापासून या चॅटबॉटने जगभरात वादळ निर्माण केलं आहे. युजर्सनं कोणत्याही प्रकारचा प्रश्न किंवा माहिती चॅटजीपीटीवर विचारली तर त्याला त्याचं अतिशय जलद उत्तर मिळतं. त्यामुळे चॅटजीपीटीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. हळूहळू चॅटजीपीटीने जगाला व्यापलं आहे. मात्र त्यात काही त्रुटी आढळल्याची चर्चा असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मैत्रिणीची बघत होता वाट इतक्यात आले पोलीस अन्…; स्वंतत्र भारतातील पहिल्या एन्काउंटरची अंगावर काटा आणणारी गोष्ट या पार्श्वभूमीवर या कंपनीने आर्टिफिशियल इंटिलिजन्स सिस्टीममधील त्रुटी शोधून दाखवणाऱ्या युजर्ससाठी 20,000 डॉलरपर्यंत बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या साठी द ओपनएआय बग बाउंटी प्रोग्रॅम मंगळवारी सुरू झाला. यात युजर्सनं दाखवून दिलेली सिस्टीमधील चूक किती गंभीर आहे ते तपासून, त्यानुसार ग्राहकाला बक्षीस दिलं जाणार आहे. कमी गंभीर त्रुटीला किमान 200 डॉलर्सचं बक्षीस दिलं जाणार असून गांभीर्यानुसार बक्षिसाची रक्कम वाढत जाईल. या सॉफ्टवेअरमध्ये ओपनएआय सिस्टीममध्ये कोणताही चुकीचा किंवा हानीकारक घटक नाही. मात्र गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून इटलीमध्ये चॅटजीपीटीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांमधील अधिकाऱ्यांनी जनरेटिव्ह एआय सेवांचे अधिक सखोल परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ओपनएआय कंपनीने बग बाउंटी प्रोग्रॅमची घोषणा केली आहे. प्रोग्रॅमर आणि इथिकल हॅकर्सना एखाद्या सॉफ्टवेअर सिस्टीममध्ये असलेल्या त्रुटी उघड करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञान व्यावसायिक बग बाउंटी प्रोग्रॅमचा वापर करतात. बग बाउंटी साइट बगक्राउडवरील माहितीनुसार, ओपनएआयने संशोधकांना चॅटजीपीटीचे विशेष फीचर्स तसेच ओपनएआय प्रणाली थर्डपार्टी अ‍ॅप्ससह डाटा कसा कनेक्ट आणि एक्सचेंज करतात याची तपासणी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्रुटी शोधून दाखवणाऱ्याला कंपनीकडून 20,000 डॉलरपर्यंत बक्षीसं देण्यात येणार आहेत. 7 सशस्त्र गुंडांशी तब्बल 4 तास एन्काउंटर; लोखंडवालातील ‘त्या’ शूटआऊटचे खरे हिरो; कोण होते IPS आफताब अहमद खान या प्रोग्रॅमसाठी कंपनीनं काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार, जोपर्यंत तुम्ही या धोरणानुसार चाचणी करत आहात तोपर्यंत तुम्हाला चाचणीची परवानगी असेल. या धोरणाचं पालन करणं आवश्यक इतर नियमांच्या तुलनेत कशाचं पालन करायचं असा प्रश्न निर्माण झाल्यास मुख्य धोरणाला प्राधान्य दिलं जाईल. सहभागी संशोधकाला आर्टिफिशियल इंटिलिजन्स सिस्टीममध्ये कोणतीही त्रुटी किंवा असुरक्षित बाब आढळल्यास त्याने तातडीनं कळविणे आवश्यक आहे. सहभागी व्यक्तींनी सिस्टीममध्ये व्यत्यय आणून, डाटा इरेज करून आणि युजर्सच्या अनुभवावर नकारात्मक प्रभाव टाकून अशा कोणत्याही पद्धतीने सिस्टीम युजर्सच्या गोपनीयतेला धक्का लावता कामा नये. सिस्टीममध्ये काही त्रुटी दिसल्यास त्या सांगण्यासाठी ओपनएआयद्वारे प्रदान करण्यात आलेल्या बगक्राउड अ‍ॅप्लिकेशनचा वापर करावा. जोपर्यंत ओपनएआयची सुरक्षा टीम असुरक्षित फीचर्सच्या प्रसारासाठी अधिकार देत नाही तोपर्यंत त्याविषयी गोपनीयता राखावी.

अहवाल मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत अधिकृतता प्रदान करणे हे टीमचे उद्दिष्ट असेल. यासाठी कार्यक्षेत्रातील सिस्टीमची चाचणी घ्यावी आणि कार्यक्षेत्राबाहेरील सिस्टीमचा आदर करावा. सहभागी व्यक्तींना ओपनएआयच्या संवेदनशील डाटासह इतर लोकांच्या मालकीच्या डाटामध्ये प्रवेश करण्यास, तो एडिट करण्यास किंवा वापरण्यास परवानगी नसेल. जर एखाद्या असुरक्षिततेमुळे असा डाटा उघड झाला तर चाचणी थांबवण्यात येईल. याचा अहवाल तातडीने पाठवला जाईल आणि मटेरिअल्सच्या सर्व कॉपीज हटवल्या जातील. जोपर्यंत ओपनएआय तुम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त तुमच्या अकाउंटशी संवाद साधावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या