जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 7 सशस्त्र गुंडांशी तब्बल 4 तास एन्काउंटर; लोखंडवालातील 'त्या' शूटआऊटचे खरे हिरो; कोण होते IPS आफताब अहमद खान

7 सशस्त्र गुंडांशी तब्बल 4 तास एन्काउंटर; लोखंडवालातील 'त्या' शूटआऊटचे खरे हिरो; कोण होते IPS आफताब अहमद खान

कोण होते IPS आफताब अहमद खान

कोण होते IPS आफताब अहमद खान

आज आम्ही तुम्हाला ज्या IPS अधिकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ते अधिकारी खास आहेत. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे किस्से ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि सॅल्यूट कराल

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 15 एप्रिल : देशात नेहमी कर्तव्यदक्ष आणि सामान्य लोकांसाठी जीवही पणाला लावणाऱ्या पोलिसांबद्दल विचारलं तर नेहमीच एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘मुंबई पोलीस’. मुंबई पोलीस दलात आजपर्यंत असे असे धुरंधर आणि निडर पोलीस ऑफिसर्स होऊन गेलेत ज्यांनी नेहमीच मोठे पराक्रम केले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ज्या IPS अधिकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ते अधिकारी खास आहेत. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे किस्से ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि सॅल्यूट कराल यात शंका नाही. कोण होते हे IPS ऑफिसर्स ज्यांनी शत्रूला सळो की पळो करून सोडलं? बघूया… आम्ही बोलत आहोत. IPS ऑफिसर आफताब अहमद खान यांच्याबद्दल. कदाचित यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेलही पण आज आम्ही त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील. ‘ते’ नुसते दिसले तरी थरथर कापतात गुन्हेगार; आतापर्यंत तब्बल 60 एन्काऊंटर केलेले IPS आहेत तरी कोण? आफताब अहमद खान यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1940 रोजी झाला. त्यांचे वडील एएस खान हे अविभाजित हैदराबाद राज्य आणि नंतर बॉम्बे राज्यात प्रसिद्ध सरकारी वकील होते, त्यांनी औरंगाबाद सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली होती. आफताब अहमद खान यांना IPS होण्याची इच्छा होती त्यानुसार ते IPS झाले. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी, खान हे 1980 च्या दशकात महाराष्ट्र राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक होते. 1963 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आफताब अहमद खान हे लाइमलाईट मध्ये आले जेव्हा ते गुंडांसोबत तब्बल 4 तास लढले. 1991 मध्ये अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये माया डोलाससह सात कथित सशस्त्र गुंडांच्या चार तासांच्या चकमकीचे नेतृत्व करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. जाड पिळदार मिश्या आणि दबंग पर्सनॅलिटी, ‘Iron Man’ म्हणून ओळखले जातात ‘हे’ IPS Officer, गिनीज बुकमध्येही आहे नाव टीव्ही चॅनेलवर या चकमकीचे थेट कव्हरेज करण्यात आले आणि त्यावेळी खळबळ उडाली. खान तेव्हा अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) होते. ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ या बॉलिवूड चित्रपटालाही या घटनेने प्रेरणा दिली. या घटनेनंतर काही आरोप झाले आणि त्यानंतर खानविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे फिलाडेल्फिया आणि लॉस एंजेलिस पोलिसांच्या ‘स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिकल टीम’ (SWAT) च्या धर्तीवर महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथक (ATS) सुरू करण्याचे श्रेय आफताब अहमद खान यांना जातं. दहशतवाद आणि त्यामुळे धोका यांना लगाम घालण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र ATS ची स्थपना केली. शहरातील काही मोठ्या दहशतवादी घटनांचा तपास करण्यात आजपर्यंत ATS चा मोठा वाटा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

निवृत्तीनंतर, खान 1998 मध्ये जनता दल पक्षात सामील झाले आणि मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले. मात्र ते अयशस्वी झाले आणि नंतर त्याने स्वतःची सुरक्षा फर्म सुरू केली. COVID-19 शी झुंज दिल्यानंतर वयाच्या 81 व्या वर्षी 21 जानेवारी 2022 रोजी मुंबईत न्यूमोनियामुळेत्यांचं निधन झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात