JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NEET UG 2023: परीक्षेसाठी अजूनही रजिस्टर केलं नाही? घाई करा; अवघे काही तास शिल्लक; ही घ्या डायरेक्ट लिंक

NEET UG 2023: परीक्षेसाठी अजूनही रजिस्टर केलं नाही? घाई करा; अवघे काही तास शिल्लक; ही घ्या डायरेक्ट लिंक

ज्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करायचा आहे, ते NEET परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात.

जाहिरात

NEET UG 2023

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 एप्रिल: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित NEET UG परीक्षेसाठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख आहे. NEET UG परीक्षेसाठी नोंदणी आज म्हणजेच 6 एप्रिलपर्यंत करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करायचा आहे, ते NEET परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा, अंडरग्रेजुएट (NEET-UG) साठी नोंदणी 6 मार्च रोजी सुरू झाली. नोंदणीसाठी पूर्ण महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, जो आज संपत आहे. विद्यार्थी आज रात्री 11.50 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. CRPF Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 1,29,929 पदांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; पात्रता फक्त 10वी; करा अप्लाय असं करा रजिस्टर सुरुवातीला NEET UG नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, तुम्हाला NEET UG अर्ज फॉर्म 2023 लिंक दिसेल. लिंक वर क्लिक करा. आता एक नवीन लॉगिन/नोंदणी पृष्ठ उघडेल. NTA NEET पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज तपासा. सर्व आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. अर्ज डाउनलोड करा. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? NEET 2023 परीक्षेची तारीख पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET 2023 परीक्षा 7 मे रोजी घेतली जाईल. एनटीएने जाहीर केले की नीट यूजी परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली आहे. NEET अर्ज फॉर्म 2023 लिंक कुठली मंदी? देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये पडणार जॉब्सचा पाऊस; काय असेल पात्रता? आताच बघा डिटेल्स NEET UG परीक्षेचा नमुना NEET 2023 च्या प्रश्नपत्रिकेत एकूण 200 प्रश्न असतील, ज्यामध्ये 180 प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असेल. सर्व प्रश्नांपैकी 45-45 प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून विचारले जातील. जीवशास्त्र विभागात नव्वद प्रश्न असतील. उमेदवारांना सांगण्यात आले आहे की त्यांना NEET 2023 च्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागेल.

इतकी असेल अर्जाची फी यंदा सर्व उमेदवारांसाठी NEET साठी अर्ज शुल्क वाढवण्यात आले आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना नोंदणीसाठी 1700 रुपये द्यावे लागतील. EWS आणि OBC साठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे. SC, ST, PWD आणि तृतीय लिंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900 रुपये आहे. भारताबाहेरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 9500 रुपये भरावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या