जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CRPF Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 1,29,929 पदांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; पात्रता फक्त 10वी; करा अप्लाय

CRPF Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 1,29,929 पदांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; पात्रता फक्त 10वी; करा अप्लाय

केंद्रीय राखीव पोलीस दल

केंद्रीय राखीव पोलीस दल

या पदभरतीमध्ये CRPF कडून एकूण 1,29,929 पदांची नियुक्ती केली जाईल. यापैकी 1,25,262 पदे पुरुष उमेदवारांसाठी, तर 4667 पदे महिलांसाठी राखीव आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 एप्रिल: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदभरतीमध्ये CRPF कडून एकूण 1,29,929 पदांची नियुक्ती केली जाईल. यापैकी 1,25,262 पदे पुरुष उमेदवारांसाठी, तर 4667 पदे महिलांसाठी राखीव आहेत. CRPF मध्ये कॉन्स्टेबल भरती फक्त भारतीय नागरिकांची असेल. नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना या भरती मोहिमेत प्राधान्य दिले जाणार नाही. कुठली मंदी? देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये पडणार जॉब्सचा पाऊस; काय असेल पात्रता? आताच बघा डिटेल्स या जागांसाठी भरती कॉन्स्टेबल (Constable) एकूण जागा - 1,29,929 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या समकक्ष शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? इतका मिळणार पगार कॉन्स्टेबल (Constable) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना अशी होणार निवड तरुणांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागेल. कॉन्स्टेबल म्हणून नियुक्तीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर एखादा माजी अग्निशामक या नोकरीसाठी अर्ज करेल, तर त्याला शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून जावे लागेल. 0वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची लॉटरी; राज्याच्या कृषी विभागात 60 जागांसाठी भरतीची घोषणा ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच

JOB TITLECRPF recruitment 2023
या जागांसाठी भरतीकॉन्स्टेबल (Constable) एकूण जागा - 1,29,929
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या समकक्ष शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकॉन्स्टेबल (Constable) - 21,700/- - 69,100/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rect.crpf.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात