मुंबई, 06 एप्रिल: महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांमध्ये भारतीय आयटी क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीसह एचसीएल आणि विप्रो या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असो किंवा नसो तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ‘टेकगिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. टीसीएस कंपनीनं आपल्या बेंगळुरूतील ऑफिसमध्ये अँग्युलर डेव्हलपर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? भूमिका आणि जबाबदाऱ्या: 1. अँग्युलर 6 आणि त्यापेक्षा जास्त स्तरांबाबत सखोल ज्ञान आणि डेव्हलपमेंटचा अनुभव आवश्यक आहे. 2. HTML5, CSS3, JSON या वेब तंत्रज्ञानामध्ये आणि क्रॉस-ब्राउझरशी सुसंगत कोड लिहिण्यात निपुण असणं आवश्यक. 3. टाइपस्क्रिप्ट डोम मॅनिप्युलेशन तंत्र आणि रेस्टफुल सेवांची चांगली समज आवश्यक. 4. आधुनिक MV-VM/MVC फ्रेमवर्कपैकी कोणत्याही एकामध्ये तज्ज्ञ असणं गरजेचं. 5. अँगुलर अॅप्लिकेशन्स आणि डिरेक्टिव्हची अंमलबजावणी करण्याचा अनुभव आवश्यक. एचसीएल कंपनीनं आपल्या बेंगळुरूतील ऑफिसमध्ये सीनिअर टेक्निकल लीड पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. 10वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची लॉटरी; राज्याच्या कृषी विभागात 60 जागांसाठी भरतीची घोषणा भूमिका आणि जबाबदाऱ्या: 1. ETL प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्या SQL सर्व्हर संग्रहित प्रक्रिया, फंक्शन्स, व्ह्युज आणि ट्रिगर्स डिझाइन व विकसित करणं. 2. QRM द्वारे प्रक्रियेसाठी असंख्य अपस्ट्रीम सिस्टिम्समधून डेटा प्राप्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी SSIS / SQL ETL उपायांचं डिझायनिंग आणि डेव्हलपिंग करता आलं पाहिजे. 3. SSIS सह फाइल्समधून डेटा इम्पोर्ट करणं, एका डेटाबेस प्लॅटफॉर्मवरून दुसर्या डेटाबेसवर डेटा हलवणं यासह डेटा ट्रान्सफॉर्मेशन करता येणं गरजेचं. 3. डेटाची अचूक आणि कार्यक्षम प्रोसेस सुनिश्चित करण्यासाठी SSIS किंवा इतर ETL प्रक्रिया डीबग आणि ट्युन करणं. 4. डेटाबेस ऑब्जेक्ट्स (टेबल, व्ह्युज, इंडेक्स) आणि डेटाबेस सिक्युरिटी डिझाईन, अंमलबजावणी आणि देखरेख करणं. 5. SSIS पॅकेजेससह काम करण्याचा अनुभव गरजेचा. 6. मायक्रोसॉफ्ट SSIS सारख्या ETL टूल्समध्ये निपुण असणं गरजेचं. 7. सोर्स, स्टेजिंग आणि ODS/डेटा वेअरहाउस डेस्टिनेशन्समधील डेटा इम्पोर्ट आणि ट्रान्सफर करण्यासाठी स्ट्रॅटजिज आणि दृष्टिकोनांचं विश्लेषण आणि ते विकसित करणं. Explainer: राज्य सरकारकडून का बंद करण्यात आलं डीएड? मग आता शिक्षक व्हायचं तरी कसं? बघा रोडमॅप 8. प्रॉडक्शन आणि नॉन-प्रॉडक्शन वातावरणात तैनात करण्यासाठी ETL प्रक्रियांची तयारी करणं आणि त्यांची चाचणी करणं. 9. SQL सर्व्हर डेटाबेसचं ज्ञान असावं तसंच यासंबंधी डेव्हलपमेंट प्लॅन्स किंवा रिफाईनमेंट टेस्ट प्लॅन्ससह सपोर्ट सिस्टिम व अॅक्सेप्टन्स टेस्टिंगचही ज्ञान असावं. 10. कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा डेटा इंटिग्रेशन (सोर्सिंग, स्टेजिंग, मॅपिंग, लोडिंग) अनुभव, SSIS प्रीफर्ड CSV फाइल्स, XML फाइल्स, कॉमन रिलेशनल डेटाबेस स्रोतांमधून डेटा बदलण्याचा अनुभव असलेल्या विस्तृत श्रेणीसह SSIS घटकांचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. 11. ट्रान्झॅक्ट-एसक्यूएल सह संचयित प्रक्रिया डेव्हलपमेंटचा अनुभव गरजेचा. 12. स्टार स्कीमाज आणि डेटा क्युब्जसह रिलेशनल डेटाबेसच्या लॉजिकल आणि फिजिकल डिझाईनचं सखोल ज्ञान आवश्यक. 13. डिस्ट्रिब्युटेड डेव्हलपमेंट टीम्ससह काम करण्याचा अनुभव विप्रो कंपनीनं आपल्या नोएडातील ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. काय सांगता! आता टीव्हीवरील प्रोग्राम बघूनही क्रॅक करता येईल UPSC परीक्षा? ‘हे’ कार्यक्रम मिस करूच नका भूमिका आणि जबाबदाऱ्या: 1. माहितीच्या गरजा, सिस्टिम फ्लो, डेटा युसेज आणि कार्य प्रक्रियांचा अभ्यास करून सॉफ्टवेअर सोल्युशन्स डेव्हलप करणं. 2. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकलनंतर येणाऱ्या अडचणी तपासणं. 3. सिस्टिम इश्युज आणि प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या मूळ कारणांचं विश्लेषण करून ते सोपं करणं. 4. सिस्टिम कार्यप्रदर्शन आणि इम्पॅक्ट उपलब्धता सुधारण्यासाठी नवीन आयडिया शोधणं. 5. क्लायंटच्या गरजांचं विश्लेषण करणं आणि त्या गरजांना व्यवहार्य डिझाईनमध्ये रूपांतरित करणं. 6. फंक्शनल टीम्स किंवा सिस्टिम अॅनॅलिस्ट्सच्या सहकार्यानं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्समधील तपशीलांची तपासणी करणं.
7. सॉफ्टवेअर क्षमतांबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरशी चर्चा करणं. 8. अॅनॅलिसिस, प्रॉब्लेम डेफिनेशन, रिक्वायरमेंट्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रस्तावित सॉफ्टवेअरचं मूल्यांकन करून त्याची ऑपरेशनल व्यवहार्यता निश्चित करणं. 9. टेस्ट केसेस/सिनॅरिओज/युसेज केसेस सेट अप आणि डिझाईन करून, त्यांची अंमलबजावणी करून सॉफ्टवेअर प्रमाणीकरणासाठी प्रक्रिया विकसित आणि स्वयंचलित करणं. 10. त्रुटी दूर करण्यासाठी, नवीन हार्डवेअरशी जुळवून घेण्यासाठी, त्याचं कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी किंवा इंटरफेस अपग्रेड करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं. 11. नवीन सिस्टिमच्या इन्स्टॉलमेंटची किंवा सध्याच्या प्रणालीतील बदलांची शिफारस करण्यासाठी आणि प्लॅन करण्यासाठी माहितीचं विश्लेषण करणं.