दुप्पट होणार पगार
मुंबई, 27 एप्रिल: आयटी सेक्टर सध्या कठीण काळातून जात आहे. मेटा, अॅमेझॉन यांसारख्या अनेक टेक कंपन्यांनी आपल्या खर्च कमी करण्यासाठी आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारतीय कंपनी याला अपवाद आहे. सध्याच्या आव्हानात्मक मार्केटमध्ये कंपनीनं आपली चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचार्यांना कामावरच ठेवल नाही तर त्यांच्यामधील वेतन असमानता कमी करण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनीतील कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचार्यांमध्ये वेतन असमानता असणं ही अगदी सामान्य बाब आहे. मात्र, टीसीएस हा फरक नाहीसा करण्याचा विचार करत आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. टीसीएसचे जागतिक स्तरावर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. फ्रेशर्सना भरघोस वेतनवाढ देण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी, अगोदरच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या संधी देण्याची रणनीती कंपनी तयार करत आहे. टीसीएसचे चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, कंपनी आपल्या कर्मचार्यांना अपस्कील करण्याची संधी देण्याचा आणि त्यांचे पगार दुप्पट करण्याचा विचार करत आहे.
कर्मचार्यांमधील वेतन असमानता कमी करण्याच्या कंपनीच्या योजनांबद्दल बोलताना मिलिंद लक्कड म्हणाले, “दोन वर्षांच्या काळातील घडामोडी समाधानी नक्कीच होत्या. या काळात आम्ही काही लोकांना गमावलं कारण त्यांना दुसरीकडे काही टक्के जास्त पगारवाढ मिळत होती. याउलट आम्ही काही लोकांना कामावरदेखील ठेवलं. आम्ही दिलेली वाढ इतर कंपन्यांसारखी नसली तरी वाढ मात्र नक्की दिली. आम्ही हेदेखील सुनिश्चित केलं की, अंतर्गत असमानता कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विविध उपक्रमांद्वारे अपग्रेड करण्याची संधी मिळेल.” Career Tips: करिअरमध्ये सतत यश आणि पगारवाढ हवीये? मग ‘या’ पाच गोष्टी करतील मदत रिपोर्टमध्ये पुढे असं म्हटलं आहे की, टीसीएस आपल्या विद्यमान कार्यक्रमांमध्ये विविध अनुभव स्तरांवरून अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याची योजना आखत आहे. जेणेकरून त्यांना ते सध्या कमवतात त्यापेक्षा दुप्पट कमाई करण्याची संधी देता येईल. दरवर्षी केवळ 10 टक्के लोक त्यांच्या पहिल्या प्रयत्नात हे उच्च-स्तरीय कार्यक्रम पार करण्यात यशस्वी ठरतात. टीसीएसचा ‘Elevate’ हा टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अनेकदा चर्चेत असतो. मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, 0 ते12 वर्षांदरम्यान अनुभव असलेल्या सुमारे 4 लाख कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. जे लोक हाय-बार असेसमेंट क्लिअर करतात त्यांचे पगार लगेच दुप्पट होतात. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा लक्कड यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या मते, कार्यक्रम संपल्यानंतर 4 ते 12 वर्षांचा अनुभव असलेले कर्मचारी टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी, आयओटी, अॅनॅलिस्टिक्स आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्स यांसारख्या क्षेत्रात विशेषज्ञ बनू शकतात. त्यानंतर ते ज्या क्षेत्रात लक्ष केंद्रित करू इच्छितात ते निवडू शकतात. मध्यम श्रेणीतील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ तत्काळ होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “त्यांना किकरचा एक भाग मिळतो आणि जेव्हा ते त्या भूमिकेत नियुक्त केले जातात तेव्हा त्यांना उर्वरित किकर मिळेल.” पत्रकारांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग Oxford युनिव्हर्सिटीत जर्नालिस्ट फेलोशिप करा ना; ही घ्या माहिती टीसीएसमध्ये नोकरीची संधी काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की 2024 या आर्थिक वर्षासाठी, टीसीएसनं फ्रेशर्ससाठी तब्बल 44 हजार जॉब ऑफर आणल्या आहेत. या काळात फ्रेशर्सच्या ऑफर रद्द करणाऱ्या किंवा त्यांच्या ऑनबोर्डिंगला उशीर करणाऱ्या इतर टेक कंपन्यांच्या विपरीत, टीसीएसनं सर्व ऑफरना न्याय देण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर, सध्याच्या कर्मचार्यांना 12 ते 15 टक्के स्टँडर्ड वेतनवाढीसह त्यांच्या व्हेरिएबलच्या 100 टक्के मिळतील, असं आश्वासनही लक्कड यांनी दिले. अरे याला जिद्द म्हणावी की काय? 1962 पासून तब्बल 56 वेळा दिली 10वीची परीक्षा; 57व्या वेळी झाले पास लक्कड यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे, “आम्ही सर्व जॉब ऑफरचा स्वीकार करत आहोत. 2023 या आर्थिक वर्षात नेट बेसिसवर आम्ही 22 हजार 600 कर्मचारी कंपनीशी जोडले आहेत. वर्षभरात, आम्ही 44 हजार पेक्षा जास्त फ्रेशर्स आणि आमच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक अनुभवी प्रोफेशनल्सना ऑनबोर्ड घेतलं आहे.”