JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Layoffs News : मेटामध्ये पुन्हा कर्मचारी कपात होणार, नेमकं काय आहे कारण?

Layoffs News : मेटामध्ये पुन्हा कर्मचारी कपात होणार, नेमकं काय आहे कारण?

कंपनीचे मानव संसाधन प्रमुख लॉरी गोलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 4 महिन्यांचा पगार दिला जाईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : फेसबुकची मूळ कंपनी मेटा येत्या काही दिवसांत पुन्हा कर्मचाऱ्यांना मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. मेटामध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने कर्मचारी कपात करण्याची तयारी केली आहे. फायनान्शिअल टाईम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, मेटामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सध्या टांगती तलवार आहे. आता पुन्हा छाटणीची चिंता सतावू लागली आहे. येत्या काळात मेटामध्ये छाटणी होत असेल, तर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा सलग दुसऱ्या वर्षी मेटामध्ये कर्मचारी कपात केली जाणार आहे. याआधी गेल्या वर्षी कंपनीने सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. अशा परिस्थितीत, ही कपात केवळ मेटामध्येच नाही, तर अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे. Meta Platforms Inc. ने 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Facebook म्हणजे फक्त टाईमपास नाही गड्यांनो, इथूनही मिळतात लाखो रुपये सॅलरीचे जॉब्स; या घ्या ट्रिक्स

नवीन भरती देखील मेटाने बंद केली आहे. ‘मेटा’च्या ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यांना 4 महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. कंपनीचे मानव संसाधन प्रमुख लॉरी गोलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 4 महिन्यांचा पगार दिला जाईल.

कर्मचारी कपातीनंतर मार्क झुकरबर्गही देणार राजीनामा?

संबंधित बातम्या

2004 मध्ये सुरू झालेल्या कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. कंपनीची खराब आर्थिक स्थिती आणि खराब तिमाही निकालामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Meta च्या पोर्टफोलिओमध्ये Facebook, Instagram आणि WhatsApp सारख्या प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे. परंतु त्याच्या मेटाव्हर्स व्यवसायावर जास्त गुंतवणूक केल्यामुळे, कंपनीची आर्थिक स्थिती खवळली. खूप गुंतवणूक केली, पण परतावा मिळाला नाही, मग परिस्थिती बिकट होऊ लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या