मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कर्मचारी कपातीनंतर मार्क झुकरबर्गही देणार राजीनामा?

कर्मचारी कपातीनंतर मार्क झुकरबर्गही देणार राजीनामा?

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. ट्विटरच्या मालकी हक्कांमध्ये बदल झाल्यापासून ही सोशल मीडिया कंपनी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाचाही समावेश झाला आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये (3 नोव्हेंबर) मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिला. त्यानंतर, मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्माचारी कपात ठरली आहे.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 11 हजार लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. या कर्मचारी कपातीबद्दल मार्क यांनी माफीही मागितली आहे. हे प्रकरण मागे पडत नाही तोच पुन्हा एकदा मार्क झुकरबर्ग चर्चेत आले आहेत.

स्वत: मार्क आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात. मार्क झुकरबर्गच्या राजीनाम्याचं वृत्त मेटाच्या प्रवक्त्यानं फेटाळलं आहे.

मेटाचे संपर्क प्रमुख अँडी स्टोन यांनी सीईओंच्या राजीनाम्याचं वृत्त एक अफवा असल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी कंपनीच्या सध्याच्या प्रोजेक्टनंतर मोठे बदल करण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. ‘अमर उजाला’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

'द लीक' नावाच्या वेबसाईटनं आपल्या वृत्तामध्ये दावा केला आहे की, मार्क झुकरबर्ग कंपनी सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मेटाव्हर्स प्रकल्पावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण, त्याचे परिणाम दिसत नसल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे. याशिवाय, मार्क झुकरबर्गच्या व्हीआर प्रोजेक्टलाही मार्केटमधून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

असं बोललं जात आहे की, मेटाव्हर्ससारखे प्रकल्प अपयशी ठरल्यानंतर आणि गुंतवणूकदार निघून गेल्याबद्दल मार्क झुकरबर्ग स्वतःला जबाबदार धरणार आहेत. मेटाव्हर्समुळे मेटाचा स्टॉक 70 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे.

मेटाच्या रँकिंगमध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 2022 मधील 'एस अँड पी 500' यादीत मेटानं आत्तापर्यंतची सर्वांत वाईट कामगिरी केली आहे. मार्क यांचा राजीनामा हा फक्त एक पीआर स्टंट असल्याचंही म्हटलं जात आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला फायनॅन्शिअल टाइम्सनं आपल्या वृत्तामध्ये म्हटलं होतं की, मेटाचे गुंतवणूकदार आता मार्क झुकरबर्गवर विश्वास ठेवण्यास इच्छुक नाहीत. मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता दुप्पटीनं कमी झाली आहे. ब्रॅड गेर्स्टनरच्या एका खुल्या पत्रानंतर हे सर्व समोर आलं आहे. ज्यांच्या 'अल्टिमीटर कॅपिटल'कडे मेटाचे लाखो डॉलर्सचे शेअर्स आहेत.

First published:

Tags: Facebook