मुंबई, 18 जानेवारी: Facebook म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि मनोरंजनाच्या पोस्ट्स. अर्थात फेसबुक म्हणजे आजकाल टाईमपासचं साधन मानलं जातं. पण असं आजिबात नाही. तुम्ही फेसबुकद्वारेही जॉब मिळवू शकता आणि आपल्या करिअरला पुढे नेऊ शकता. योग्य रणनीतीसह, तुम्ही तुमच्या पुढील नोकरीसाठी Facebook कार्यक्षमतेने आणि यशस्वीपणे वापरू शकता. तुमच्या नोकरीच्या शोधासाठी आणि करिअरच्या पुढील वाटचालीसाठी Facebook चा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हीही Facebook वर फक्त स्क्रोल करत बसणार नाही तर जॉब शोधाल.
Facebook द्वारे जॉब शोधण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमची फेसबुक प्रोफाइल प्रोफेशनल बनवणं आवश्यक आहे. साधारणतः आपण आपल्या फेसुबक प्रोफाइलहे किंवा आपल्या वॉलवर काहीही फोटोज अपलोड करतो जे पर्सनल किंवा इतरांचे असू शकतात. अशा फोटोजमुळे तुमची प्रोफाईल चेक करणाऱ्या लोकांचं मत वेगळं होऊ शकतं म्हणून प्रोफेशनल प्रोफाइल असणं आवश्यक आहे.
MahaGenco Recruitment: महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी
तसंच Facebook द्वारे जॉब शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचं टूल म्हणजे Facebook Groups. तुमच्या फिल्डमधील किंवा तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे अशा फिल्डचे अनेक ग्रुप्स फेसबुकवर असतात. या सर्व ग्रुप्सना तुम्ही जॉईन करू शकता. पण नुसतं जॉईन करून तुम्हाला नोकरी मिळेलच असं नाही. या ग्रुपमध्ये काही IMP गोष्टी केल्यामुळे तुम्हाला जॉब मिळू शकतो
ग्रुपचे नियम पाळणं आवश्यक आहे
काही ग्रुप्समध्ये त्यांचे स्वतःचे स्व-प्रमोशन आणि अनुमती असलेल्या पोस्ट्सचे नियम असतात, म्हणून पोस्ट करण्यापूर्वी किंवा प्रतिसाद देण्यापूर्वी त्या ग्रुपचे जाणून घ्या. यामुळे तुम्ही प्रोफेशनल आहात असं त्या ग्रुपच्या लक्षात येईल आणि तुमचा इम्प्रेशन क्रिएट होईल.
LIC AAO Recruitment: अधिकारी पदाच्या तब्बल 300 जागांसाठी बंपर ओपनिंग्स
ग्रुपमधील अनुभवी प्रोफेशनल्सना कनेक्ट करा
तुमच्या फेसबुक ग्रुपमधील जे ही प्रोफेशनल्स असतील अशा लोकांना कनेक्ट करा. त्यांच्याशी त्यांची अनुमती घेऊन बोला. तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे त्या जॉबबद्दल त्यांचा रेफरन्स मागा.
संबंधित पोस्ट शेअर करा
ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संबंधित बातम्या पोस्ट करणे किंवा दुसर्याच्या संबंधित पोस्ट शेअर करणे. ऑनलाइन असंख्य बनावट बातम्या दिल्यास, मात्र कोणतीही बातमी कायदेशीर आहे याची खात्री करण्यासाठी पोस्ट करण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याचे सुनिश्चित करा.
जॉब्स ग्रुपला जॉईन करा आणि अप्लाय करा
फेसबुकवरील जॉब्स ग्रुपला कनेक्ट कर आणि त्यावरील जॉबच्या पोस्टला चेक करा आणि अप्लाय करायला सुरुवात करा. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला फेसबुक द्वारे जॉब मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Facebook, Job alert, Jobs Exams