केंद्रीय राखीव पोलीस दल
मुंबई, 25 एप्रिल: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याद्वारे 9212 रिक्त जागा भरण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यापैकी 9105 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि 102 महिला उमेदवारांसाठी आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर अर्ज करू शकतात. उमेदवारांना 27 मार्च 2023 पासून सीआरपीएफ भरतीसाठी अर्ज करता येईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 आहे. निवड प्रक्रियेसाठी येत असताना, उमेदवारांनी कॉम्प्युटर टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टमध्ये पात्र असणं आवश्यक आहे.
अशी आहे निवड प्रक्रिया कॉन्स्टेबल पदासाठी ऑफलाइन अर्ज करण्याचा पर्याय नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणं आवश्यक आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून परीक्षा होईल. सीआरपीएफ सर्व परीक्षांवर देखरेख करेल. मेडिकल टेस्टच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रं आणि प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबची सर्वात मोठी संधी; परराष्ट्र मंत्रालयात 10 लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी; करा अप्लाय असा करा अर्ज सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करून अर्ज ऑनलाइन सबमिट करावा. तसंच सीआरपीएफ वेबसाइटवरून डिस्कनेक्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी किंवा शेवटच्या दिवसांमध्ये जास्त ट्रॅफिकमुळे लॉग इन न होण्याचा धोका टाळण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधीच त्यांचा ऑनलाइन अर्ज सबमिट करावा, असेही आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जावरील सर्व फील्डमध्ये योग्य माहिती भरली असल्याची खात्री करावी. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल, दुरुस्त्या किंवा सुधारणा करता येणार नाहीत. या संदर्भात फॅक्स, ईमेल, हँड डिलिव्हरी इत्यादीद्वारे केलेल्या विनंत्या विचारात घेतल्या जाणार नाहीत. IAS-IPS होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर; ‘ही’ युनिव्हर्सिटी FREE मध्ये देणार UPSC कोचिंग परीक्षा शुल्क किती? खुल्या, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 100 रुपये आहे. जे उमेदवार एससी, एसटी, महिला (सर्व श्रेणी) किंवा माजी सैनिक श्रेणी अंतर्गत येतात त्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन भरावं. Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क किती असेल पगार? कॉन्स्टेबल पदाची वेतनश्रेणी 21,700 ते 69,100 रुपये आहे. परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. ही राज्य/केंद्रशासित प्रदेशासंबंधी भरती आहे, त्यामुळे उमेदवारांनी ते ज्या राज्य/केंद्रशासित प्रदेशामध्ये राहतात, तेथील रहिवासी पुरावा आणि पीआरसी सबमिट करणे आवश्यक आहे.