जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IAS-IPS होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर; 'ही' युनिव्हर्सिटी FREE मध्ये देणार UPSC कोचिंग

IAS-IPS होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर; 'ही' युनिव्हर्सिटी FREE मध्ये देणार UPSC कोचिंग

FREE मध्ये देणार UPSC कोचिंग

FREE मध्ये देणार UPSC कोचिंग

तुम्हीही यूपीएससीची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण….

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल: देशातले लाखो विद्यार्थी दरवर्षी केंद्राच्या प्रशासकीय सेवा परीक्षा देतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे या परीक्षा घेतल्या जातात. यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रशासकीय सेवांत नोकरीची संधी मिळते. या नोकरीला वेगळीच प्रतिष्ठा आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्हीही यूपीएससीची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या परीक्षांच्या तयारीसाठी आता जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. घरी बसून परीक्षार्थी त्यासाठी अर्ज करू शकतात. यूपीएससी परीक्षा अत्यंत कठीण असते. त्यासाठी पहिल्या प्रयत्नात यश मिळवणं अवघड असतं. अनेक विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी क्लासेस लावून शिक्षण घेतात. या क्लासेसची फीदेखील भरमसाठ असते. मात्र जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठानं आता या परीक्षांसाठी मोफत कोचिंग सुरू केलं आहे. त्याबाबतची सूचना विद्यापीठानं वेबसाइटवर जारी केली आहे. या मोफत कोचिंगचा फायदा कोण कोण घेऊ शकतात व त्याची प्रक्रिया कशी आहे जाणून घ्या.

News18लोकमत
News18लोकमत

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातर्फे चालवलं जाणारं मोफत यूपीएससी कोचिंग अल्पसंख्याक, एससी, एसटी वर्गातील उमेदवार घेऊ शकतात. तसंच महिलांनाही याचा लाभ घेता येऊ शकतो. उमेदवारांना त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. हा अर्ज विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट jmicoe.in वर दाखल करता येईल. या साठीचे अर्ज दाखल करण्याती मुदत 20 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 25 मे 2023 आहे. Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क या फ्री कोचिंगसाठी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. ही परीक्षा 11 जून रोजी घेतली जाईल. सकाळी 11 ते 12 जनरल स्टडीजचा ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल तर 12 ते 1 निबंधाचा पेपर (विस्तृत लेखन) असेल. त्या परीक्षेचा निकाल 10 जुलैला लागू शकतो. 13 ते 24 जुलैदरम्यान ऑनलाइन पद्धतीनं मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. अंतिम निकाल निकाल 28 जुलैला लागू शकतो. 10 ऑगस्ट रोजी सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन 11 ऑगस्ट 2023 रोजी हे वर्ग सुरू होतील. दिल्ली, श्रीनगर, जम्मू, हैदराबाद, बंगळुरू, गुवाहाटी, लखनऊ, पाटणा, मुंबई आणि मलप्पुरम इथं या परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे. Job Interview ला गेल्यानंतर वरिष्ठांसोबत हॅन्ड शेक करावा की नाही? सुरुवातीला करावं तरी काय? एक्सपर्ट्स म्हणतात… केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी भरपूर मार्गदर्शन या वर्गांमध्ये उमेदवारांना मिळू शकेल. त्यामुळे यूपीएससी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी विद्यापीठाद्वारे जाहीर केलेल्या या मोफत कोचिंगच्या संधीचा जरूर लाभ घ्यावा. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात