जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क

Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क

Apple Store मधील कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये?

Apple Store मधील कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये?

Apple स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे आणि त्यांचे शिक्षण काय आहे हे सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल: Apple सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. वास्तविक, जगातील सर्वात मौल्यवान कंपनी Apple ने भारतात त्यांचे 2 नवीन स्टोअर उघडले आहेत. 2025 पर्यंत, प्रत्येक 100 पैकी 25 आयफोन भारतात बनवले जातील. अशा परिस्थितीत आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला Apple स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे आणि त्यांचे शिक्षण काय आहे हे सांगणार आहोत. यासोबतच  देशात अॅपलचे स्टोअर कुठे सुरू आहेत आणि त्यासाठी किती भाडे द्यावे लागेल हे सांगणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

Apple ज्या पद्धतीने महागडे उत्पादने बनवते आणि विकते ते आम्ही तुम्हाला सांगतो. त्याच प्रकारे, ती तिच्या कर्मचार्‍यांना मोठे पैसे देते. कंपनीने आपल्या कोणत्याही कर्मचार्‍यांच्या पगाराचा खुलासा केलेला नसला तरी, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, कंपनी भारतातील स्टोअरमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दरमहा किमान 1 लाख रुपये पगार देते. म्हणजेच जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना किमान 12 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळते. विशेष म्हणजे तंत्रज्ञानासोबतच या कर्मचाऱ्यांची अनेक भाषांवरही पकड आहे. Success Story: कधीकाळी होते कॉलेज ड्रॉपआउट, 12वीनंतर सुरु केला स्वतःचा बिझनेस; आज आहे कोट्यवधींची कमाई काय असतं कर्मचाऱ्यांचं शिक्षण अॅपलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पात्रताही खूप जास्त आहे. या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स अशा पदव्या आहेत. यातील अनेक कर्मचारी असे आहेत ज्यांनी परदेशी विद्यापीठांमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपल स्टोअरमध्ये काम करणार्‍या बहुतेक कर्मचाऱ्यांना 15 पेक्षा जास्त भाषा येतात. NCERT Recruitment: 1-2 नव्हे नॉन टिचिंग स्टाफच्या तब्बल 347 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; इथे बघा संपूर्ण डिटेल्स भारतात दोन सेंटर्स झाले सुरु अलीकडेच देशात मुंबई आणि दिल्ली येथे अॅपलचे दोन स्टोअर सुरू झाले आहेत. मुंबईचे अॅपल स्टोअर जिओ वर्ल्ड मॉलमध्ये तर दिल्लीचे साकेतमध्ये उघडले आहे. मुंबईतील स्टोअरचे भाडे 42 लाख रुपये आहे आणि दिल्लीतील स्टोअरचे भाडे 40 लाख रुपये प्रति महिना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात