टाटा कार
नवी दिल्ली, 11 जून : टाटा मोटर्सने नुकतीच अल्ट्रोज आयसीएनजी लॉन्च केली होती. याची सुरुवातीची किंमत 7.55 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडलची किंमत 10.55 लाख रुपये आहे. ही कार मल्टिपल ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. याच्या टॉप स्पेक मॉडलमध्ये सनरुफचं फिचरही मिळतंय. टाटा अल्ट्रोजचं हे मॉडेल ट्विन सीएनजी सिलिंडर सेटअपमुळे प्रसिद्ध आहे. आता कंपनी आपल्या इतर काही मॉडेल्समध्येही याचा वापर करेल. लवकरच कंपनी Tiago आणि Tigor ट्विन सिलिंडरसह मार्केटमध्ये आणणार आहे.
नॉर्मल सिंगल सिलिंडर साइजमध्ये खूप मोठा असतो आणि भरपूर बूट स्पेस व्यापून घेतो. याच कारणामुळे टाटाने सिलिंडरचे दोन भाग करून ते बूट फ्लोअरखाली प्लेस केले आहेत. हे 210 लीटर एक्स्ट्रा बूट स्पेस देते. कंपनीचे म्हणणे आहे की Altroz ज्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. तो नेहमी हा सेट-अप लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता.
या कारचं मॉडेल पाहून तुम्ही नक्की प्रेमात पडाल, सुपरकूल कारची किंमत आणि फीचर्स काय आहेत पाहामिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने या अनोख्या ट्विन-सिलेंडर सीएनजी सेट-अपसाठी पेटंट दाखल केला आहे. हा ट्विन सिलेंडर पंच iCNG मध्ये देखील वापरला जाईल. जे ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पण टाटा मोटर्सने पुष्टी केलीये की टियागो हॅचबॅक आणि टिगोर कॉम्पॅक्ट सेडानला देखील हा सेट-अप मिळेल. मात्र, हे मॉडेल जुन्या X0 प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. त्यामुळे टाटा या मॉडेल्समध्ये ते कसे स्टॅबलिश केले आणि ते अंडरबॉडी-माउंट केलेले स्पेअर व्हील देखील टिकवून ठेवण्यास सक्षम असेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Auto Expo : भारतीय बनावटीची ई-स्कूटर, जगातली पहिली ऑटो-बॅलन्सिंग बाइक; वाचा फिचर्स