मुंबई : तुम्ही विचारही केला नसेल असं एक जबरदस्त मॉडेल लवकरच लाँच होत आहे. ऑटो एक्सपो 2023 च्या निमित्ताने अशाच एक जबरदस्त कारचं मॉडेल समोर आलं आहे. ही कार दिसायला फुलपाखरासारखी वाटते मात्र त्याचं मॉडेल भन्नाट तयार केलं आहे. ही कार पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल अशी आहे.
यामध्ये अनेक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. कंपन्या त्यांच्या कॉन्सेप्ट कारचे प्रदर्शन करत आहेत. टोयोटाचा लक्झरी ब्रँड लेक्ससने आपली संकल्पना एलएफ३० कार येथे प्रदर्शित केली. लेक्सस एलएफ ३० संकल्पना ही ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये उपस्थित असलेल्या सर्वात अद्वितीय कारपैकी एक आहे. ही कन्सेप्ट कार असून ती कधी लाँच होईल त्यासाठी किती वेळ लागेल याची कोणतीही माहिती अजून कंपनीकडून देण्यात आली नाही.
Auto Expo 2023 : नाद नाही करायचा! पाण्यातही धावणार जबरदस्त कार; भारतीय जवानही हैराण
लेक्सस एलएफ३० असं या कारचं नाव असेल. ही कार फोर सीटर असेल अशी माहिती मिळाली आहे. या मॉडेलच स्टेअरिंग डाव्या हाताला आहे. या कॉन्सेप्ट कारचे संपूर्ण छत ग्लास पॅनलचं असणार आहे. भविष्यातील गोष्टींचा विचार करून या कारची अशी रचना करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
ही कार साधारण २०३० पर्यंत लाँच होऊ शकते असा साधारण कंपनीने अंदाज सांगितला आहे. ह्या कारचे दरवाजे वरच्या दिशेला उघडतात. फुलपाखरु जसे पंख हलवतं अगदी तशाच पद्धतीने या कारचे दरवाजे वर केल्यानंतर उघडले जातील. तर खाली केल्यावर बंद होतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
एकदाच चार्ज आणि 550KM सुसाट पळणार कार, पाहा पहिल्या मारुती इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
कारची लांबी 5,090 मिमी, रुंदी- 1,995 मिमी, उंची-1,600 मिमी, व्हीलबेस 3,200 मिमी आणि वजन 2,400 किलोग्रॅम असेल. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार याची रेंज 500 किमी आणि 110 किलोवॅट / तास बॅटरी पॅक असेल. याच्या चार चाकांमध्ये इलेक्ट्रिक मोटर असेल, जी बॅटरीशी जोडलेली असेल. याची बॅटरी चारही चाकांना पॉवर सप्लाय करेल.
स्पीडबद्दल सांगायचं झालं तर ही कार 3.8 सेकंदाला 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. तर टॉप स्पीड 200 किमी ताशी वेगाने धावेल हा सर्वात जास्त वेग असेल मात्र ही कार किती रंगात उपलब्ध असेल, भारतात कधी येणार किंमत काय असेल याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Auto Expo 2023, Car