नाशिक ०5 नोव्हेंबर : आधीच अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठ नुकसान झालं. डोळ्या देखत पीक वाहून गेली. हे सार झालं असताना कसबस शेतकरी उरलेली पीक सावरतोय तर आता टोमॅटोचे दर कोसळले आहेत. 10 ते 15 दिवसांपूर्वी 800 ते 900 रुपये टोमॅटोच्या कॅरेटचे दर होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टोमॅटो आता चांगल्या प्रमाणात बाजारात येऊ लागला आहे तर आता अगदी 150 ते 200 रुपये कॅरेटवर दर आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघेल की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. टोमॅटोचे दर घसरण्याची काय आहेत कारणे ? सद्या बंगलोरमध्ये देखील टोमॅटोचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील स्थानिक टोमॅटोची आवक वाढली आहे आणि तेच कारण टोमॅटोचे दर उतरण्यामागे असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितल जात आहे. मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्टयाचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यामुळे बंगलोर हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. मात्र यंदाची परिस्थिती अवघड आहे. उत्पादन खर्च निघण्याची ही शास्वती नाही.
Video : धातूच्या तुकड्यात तिला सापडलं विश्व, नाशिकच्या मुलीच्या ब्रँडची विदेशात क्रेझ!
उत्पादन खर्च निघणे अवघड पीक वाचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली मात्र हाती काहीच आल नाही. अवकाळी पाऊस झाला तेव्हा खूप नुकसान झालं होत. विविध रोगांच्या प्रादुर्भावाने धूमाकूळ घातला होता. त्यातून पीक वाचवण्यासाठी दररोज औषध फवारणी करावी लागायची सद्या औषध ही महाग झाली आहेत. त्यामुळे दुप्पट खर्च वाढला तीन एकर टोमॅटोला जवळपास पाच ते साडे पाच लाख रुपये खर्च आला.
शेतातील उभं पीक वाचवायच म्हणून इकडून तिकडून पैशांची देवाण घेवाण केली. वाटल होत उत्पादन खर्च निघून काही अंशी का होईना हाती दोन पैसे लागतील. मात्र नाही काहीच नाही. आता तर अगदी कॅरेटचे दर 150 ते 200 रुपयांवर आले. त्यातून काय भागणार उत्पादन खर्च निघन ही अशक्य आहे. त्यामुळे सरकारनेच आता काही तरी मदत जाहीर करावी अशी प्रतिक्रिया मखमलाबाद येथील शेतकरी गणेश पिंगळे यांनी दिली आहे.
Video : बहरलेल्या द्राक्ष बागेची बोली लागली, भावही ठरला! पण रात्रीत…
या वर्षी दुप्पट खर्च निसर्गाचा लहरीपणा कधी शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसेल सांगता येत नाही. या वर्षी पीक ऐन भरात आली असताना अचानक अवकाळी पावसाने हाहाकार उडवला आणि त्यात शेतातील उभी पीक बळी ठरली. त्यात टोमॅटो हे असं पीक आहे. बदलत्या हवामानाचा याला लगेच फटका बसतो. पावसात फळांची नासाडी होते,डाग लागणे, कुजने,त्यात करपा,बुरशी,यांसारखे ही रोग लगेच फोफावतात,यंदा असच झालं,रोगाने डोकं वर काढल्यामुळे शेतकऱ्यांचा औषधांचा,फवारणीचा,मजुरांचा खर्च वाढला,आणि पीक ही म्हणाव तशी राहिली नाही असंही शेतकरी गणेश पिंगळे यांनी सांगितले.