मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे याचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे फळबागा संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे सिताफळाचे उत्पन्न घेणारा शेतकरीही अडचणीत आला आहे. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाची स्थ...