नाशिक 4 नोव्हेंबर : आपल्यामध्ये काही तरी क्रिएटीव्ह करण्याची जर क्षमता असली तर आपण नक्कीच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. हे नाशिकच्या मधुरा कुलकर्णी या युवा उद्योजिकाने दाखवून दिले आहे. ‘मधेची’ या नावाने या युवा उद्योजिकाने स्वतःचा ब्रँड सुरू केला आणि त्या अंतर्गत फॅशनची ज्वेलरी ती तयार करत आहे. मधुरा कुलकर्णी तयार केलेल्या फॅशनची ज्वेलरीला नाशिक मध्येच नाही तर पुर्ण भारतभर आणि विदेशात ही मागणी आहे. अशी झाली व्यवसायाला सुरुवात मधुरा मूळची नाशिकची तीच प्राथमिक शिक्षण फ्रावशी अकॅडमी शाळेत झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण तिने आर.वाय.के कॉलेज मधून सायन्स शाखेतून पूर्ण केलं. मधुरा लहानपणापासून प्रचंड हुशार होती. तिला ड्रॉइंगची खूप आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला आवडणाऱ्या क्षेत्रात करियर करण्याची संधी दिली. बारावी नंतर पुढील परीक्षा देऊन ब्रिटनमधील बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीला जाऊन बी.ए. फॅशन डिझाईनमध्ये पदवी घेतली. अमेरिकेतून परत आल्यानंतर आता नेमक काय करायचं ? कुठून सुरू करायचं ? या गोंधळात असताना वडिलांच्या फॅक्टरी मध्ये अनेक धातूचे तुकडे पडलेले दिसले. जे काहीच कामात येत नव्हते. धातूच्या पडलेल्या तुकड्यातून आता काहीतरी नवीन करायचं ठरवून मधुराने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी नव्या व्यवसायाला गवसणी घातली.
Success Story: 500 रूपये कमी मिळाल्यानंतर पडली ठिणगी, आता तस्मिया देते हजारोंना नोकरी! Video
स्वतःचा ब्रँड तयार केला ‘मधेची’ या नावाने स्वतःचा ब्रँड सुरू केला आणि त्या अंतर्गत फॅशन ज्वेलरी ने सुरुवात केली. तरुणाईला आवडतील असे आधुनिक डीझाइन बनवून सुला फेस्ट सारख्या वेगवेगळ्या इव्हेंट्स व एक्सिबिशन मध्ये मधुरा सहभागी होऊ लागली. तिच्या नाविन्यपूर्ण डिझाईन ला भरभरून प्रतिसाद देखील मिळू लागला. मात्र व्यवसायात जम बसवताना तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. पण त्या काळात तिला आई-वडिलांची साथ आणि मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आपला ब्रँड सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी तिने डिजिटल मार्केटिंगचे शिक्षण घेतले. त्यामुळे प्रॉडक्ट नाशिक मध्ये नाही तर पुर्ण भारतभर आणि विदेशात ही विकले जात आहे. ज्वेलरी शिवाय इतर प्रॉडक्ट जसे कीचेनस, होम डेकोर, कॉरपोरेट गिफ्टिंग असे लॉंच केले. मोठ मोठ्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या कडून देखील तिच्या या उत्पादनाला कौतुकाची थाप मिळाली आहे. मृणाल कुलकर्णी, मेघना जाधव,सुयाश राय,रॅपर मडी अश्या अनेक सेलिब्रिटीसने मधेचीचे डिझाईन आवडीने घातले आहेत.
Video : अपूर्ण स्वप्नाला मिळाले पतीचे बळ, शून्यातून सुरुवात करत बनली 4 कंपन्यांची मालकीण
कोणताही व्यवसाय करताना लक्षपूर्वक करा
कोणतही काम करताना आपल्या मनात ते साध्य करण्याची जिद्द आणि चिकाटी असावी लागते. आपण त्या कामासाठी पूर्ण झोकून दिलं पाहिजे. तेव्हा सर्व शक्य होत. मग कितीही कठीण ध्येय असल तरी आपण त्याच्यापाशी पोहचतो. त्यामुळे कोणताही व्यवसाय करताना लक्षपूर्वक करा साध्य होईल अशी प्रतिक्रिया मधुरा कुलकर्णी या युवा उद्योजिकेने दिली आहे. इथे करा ऑर्डर तुम्हाला जर घर बसल्या हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचं असेल तर खालील दिलेल्या वेबसाईटला भेट द्या. अन्यथा दिलेल्या नंबरवर संपर्क करा www.madhechi.com संपर्क - 9359696021

)







