JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / Sugarcane Farmer : ठाकरे सरकारला जाग येणार का? शेतकरी आत्महत्या करतोय तरीही ऊस शेतातच, अद्यापही लाखो टन ऊस गाळपाविना

Sugarcane Farmer : ठाकरे सरकारला जाग येणार का? शेतकरी आत्महत्या करतोय तरीही ऊस शेतातच, अद्यापही लाखो टन ऊस गाळपाविना

(sugar factories) महाराष्ट्रात 25 च्यावर साखर कारखान्यांची धुराडी अद्यापही पेटलेली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (sugarcane farmer) माल शेतात वाळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 03 जून : मान्सून पूर्व (pre monsoon rain) पावसाने राज्यात धुमाकूळ सुरू असताना अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरुच आहेत. (sugar factories) महाराष्ट्रात 25 च्यावर साखर कारखान्यांची धुराडी अद्यापही पेटलेली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (sugarcane farmer) माल शेतात वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. (farmer)

दरम्यान  राज्यात यंदाच्या हंगामात 31 मेअखेर 3.75 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. त्यातील 2.80 लाख टन ऊस एकट्या मराठवाड्यातील असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी अॅग्रोवनशी बोलताना दिली.जून उजाडला तरीही उसाची वेळेत तोड होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर उसाचे एक टिपरूही गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

हे ही वाचा :  Rajya Sabha : राज्यसभेची निवडणूक अटळ; भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही घेतला मोठा निर्णय

संबंधित बातम्या

राज्यात साखर कारखान्यांनी 1 जून अखेर 1316.8 लाख टन उसाचे गाळप केले असून 1369.61 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यातील गाळप केलेल्या कारखान्यांचा 10.4 टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर राज्यात 26 कारखान्यांकडून अद्याप उसाचे गाळप सुरू आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड समर्थ अंबड (सागर), समृद्धी शुगर व श्रद्धा परतुर या चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात 1 लाख 26 हजार 307 टन ऊस शिल्लक असल्याची माहिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ पैठण या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १९९७ टन ऊस शिल्लक आहे. तर बीड जिल्ह्यातील लोकनेते माजलगाव, एन एस एल शुगर्स माजलगाव, छत्रपती माजलगाव या तीन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ४८ हजार ७६९ टन ऊस शिल्लक असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.  

जाहिरात

या सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास 132 हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी कार्यरत असल्याच साखर विभागाचं म्हणणं आहे. 31 मे अखेर गाळपात सहभागी झालेल्या कारखान्यांनी 3 कोटी 23 लाख 50 हजार 598 टन उसाचे गाळप करत 3 कोटी 20 लाख 24 हजार 754 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामध्ये उस्मानाबाद - जिल्ह्यातील 14 कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी 70 लाख 48 हजार 100 टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी 9.60 टक्के साखर उताऱ्याने 67 लाख 62 हजार 814 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जाहिरात

हे ही वाचा :  Nanduarbar Drought : गाव दुष्काळात असताना शेतकरी आला धावून, 7 वर्षे स्वत:च्या शेतातील पाणी देत गावकऱ्यांची भागवली तहान

औरंगाबाद जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 28 लाख 55 हजार 244 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.44 टक्के उताऱ्याने 29 लाख 80 हजार 710 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी 28 लाख 28 हजार 355 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.33 टक्के उताऱ्याने 29 लाख 77 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी 46 लाख 84 हजार 893 टन उसाचे गाळप करत सरासरी 8.68 टक्के उताऱ्याने 40 लाख 65 हजार 370 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.  

जाहिरात

परभणी जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी 43 लाख 43 हजार 177 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.41 टक्के साखर उताऱ्याने 42 लाख 10 हजार 295 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी 21 लाख 48 हजार 8 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.54 टक्के साखर उताऱ्याने 22 लाख 64 हजार 170 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जाहिरात

नांदेड जिल्ह्यातील सर्व सहा कारखान्यांनी 25 लाख 30 हजार 707 टन उसाचे गाळप करत सरासरी 9.80 टक्के साखर उताऱ्याने 24 लाख 79 हजार 35 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी 59 लाख 12 हजार 114 टन उसाचे गाळप करत सरासरी 10.63 टक्के साखर उताऱ्याने 62 लाख 84 हजार 960 क्विंटल साखर उत्पादन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या