मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Rajya Sabha : राज्यसभेची निवडणूक अटळ; भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही घेतला मोठा निर्णय

Rajya Sabha : राज्यसभेची निवडणूक अटळ; भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही घेतला मोठा निर्णय

Rajya Sabha Election updates: राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणूक होणार असल्याचं अटळ आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आहे.

Rajya Sabha Election updates: राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणूक होणार असल्याचं अटळ आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आहे.

Rajya Sabha Election updates: राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणूक होणार असल्याचं अटळ आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आहे.

मुंबई, 3 जून : राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने एक पाऊल टाकत भाजप नेत्यांसोबत चर्चा केली. तसेच भाजपला एक प्रस्तावही दिला. मात्र, भाजपने महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावत (BJP reject proposal of MVA) आपला तिसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. भाजपने मविआचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) सुद्धा दुसरी जागा लढण्याचा निर्धार केला आहे आणि उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती मात्र, कुठल्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं  आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक (Rajya Sabha and MLA Election) बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्नं संपले आहेत. शिवसेना आणि भाजप यापैकी कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नाहीये. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि पंरपरा आहे की, राज्यसभा निवडणुक सर्व पक्षीय सांमज्यसाने बिनविरोध करण्याची... मात्र भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या आडमुठे धोरणामुळे अखेर राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची वेळ आली आहे.

वाचा : शिवसेनेची रणनिती ठरली; पक्षाच्या आमदारांसह समर्थक MLA ला दिले खास आदेश

घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार हे आता उघड झालं आहे.

राज्यसभा निवडणूक होणारच आहे तर त्या पाठोपाठ विधान परिषदेसाठीही प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

मविआ नेत्यांची संध्याकाळी बैठक

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सायंकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमवेत चर्चा करणार आहेत.

वाचा : Rajya Sabha Election: मविआचा प्रस्ताव भाजपने धुडकावला

राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम

1) राज्यसभेच्या 57 जागांच्या सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे.

2) केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली असून, त्यासाठी 24 ते 31 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख होती.

3) अशा स्थितीत उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 1 जूनला झाली, तर 3 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येण्याची मुदत होती.

4) राज्यसभेसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विधान भवनात मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.

First published:

Tags: Election, Rajyasabha