जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Nanduarbar Drought : गाव दुष्काळात असताना शेतकरी आला धावून, 7 वर्षे स्वत:च्या शेतातील पाणी देत गावकऱ्यांची भागवली तहान

Nanduarbar Drought : गाव दुष्काळात असताना शेतकरी आला धावून, 7 वर्षे स्वत:च्या शेतातील पाणी देत गावकऱ्यांची भागवली तहान

Nanduarbar Drought : गाव दुष्काळात असताना शेतकरी आला धावून, 7 वर्षे स्वत:च्या शेतातील पाणी देत गावकऱ्यांची भागवली तहान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात (nandurbar district taloda tehsil) दुष्काळाची (drought) परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नंदुरबार, 03 जून : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात (nandurbar district taloda tehsil) दुष्काळाची (drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील काही गावातं पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. दरम्यान तालुक्यातील कित्येक गावांना मागच्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटत नसल्याचे दिसून येत आहे. तळोदा तालुक्यातील खरवड या गावात (kharvad village) पिण्याच्या पाण्याचीही (Drinking water)  भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गावातीलच एका दानशूर शेतकऱ्याने अख्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. (farmer)आपल्या शेतातील बोअर लोकांच्या सोयीसाठी खुला केल्याने त्या शेतकऱ्याचे गावातच नाहीतर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

जाहिरात

तळोदा, जि. नंदुरबार खरवड (ता. तळोदा) गावातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रकाश शिरसाट हे पुढे आले असून, गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या शेतातील कूपनलिकेच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवत आहेत. त्यामुळे प्रकाश शिरसाट यांच्या या दातृत्वाची पंचक्रोशीत चर्चा आहे.

खरवड (ता. तळोदा) या गावची लोकसंख्या जवळपास एक हजार तीनशे असून, गावाला काही वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन सरपंच जिजाबाई मोरे यांनी सोय केली होती परंतु काही दिवसांनी त्यांचाही बोअर बंद पडल्याने मोठी प्रश्न निर्माण झाला होता.  

सरपंच मोरे यांनी गावासाठी चार कूपनलिका मंजूर केल्या होत्या, परंतु त्यापैकी दोन कूपनलिकांना पाणी लागले. त्याद्वारे गावामध्ये पाणीपुरवठा काही काळ करण्यात आला. खरवड गावातील जवळपास ४५० घरांपैकी ३६० घरांना नळ कनेक्शन देत त्यातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच गावाच्या चारही बाजूंना चार ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन काढण्यात आले होते. दरम्यान काही वर्षांनंतर ही योजना पाण्याअभावी बंद पडली यामुळे पुन्हा खरवड ग्रामस्थांना पाणीटंचाई भेडसावू लागली आहे.

जाहिरात

यासाठी तेथील आमदारांनी देखील कूपनलिका मंजूर करून बोअर मारले परंतु पाणी न लागल्याने ती देखील वाया गेली. गावकऱ्यांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गावातील रहिवासी प्रकाश शिरसाट पुढे आले. शिरसाट स्वतः शेतकरी असून ते पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत यामुळे त्यांना पाण्याचे योग्य नियोजन करता येत आहे. गावातील एकही व्यक्ती पाण्यासाठी वणवण करू नये म्हणून त्यांनी ही सुविधा सुरु केली असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: drought , farmer
  • First Published :
जाहिरात
जाहिरात