JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, त्वरित करा ‘या’ तीन गोष्टींची पूर्तता, अन्यथा यादीतून वगळलं जाईल नाव अन् लाभापासून रहाल वंचित

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, त्वरित करा ‘या’ तीन गोष्टींची पूर्तता, अन्यथा यादीतून वगळलं जाईल नाव अन् लाभापासून रहाल वंचित

Pm kisan yojana: प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता.

जाहिरात

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, त्वरित करा ‘या’ तीन गोष्टींची पूर्तता, अन्यथा यादीतून वगळलं जाईल नाव अन् लाभांपासून रहाल वंचित

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जुलै: भारत सरकारद्वारे देशात अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, ज्याचा उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे ज्यांना खरोखर गरज आहे. त्याचप्रमाणे राज्यात राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मोफत आणि स्वस्त रेशन योजना अशा अनेक योजना देशात सुरू आहेत. तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana), ज्या अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला ताबडतोब पूर्ण कराव्या लागतील, अन्यथा तुम्ही हा फायदा घेऊ शकता. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची पुर्तता करणं गरजेचं आहे. या गोष्टी काळजीपूर्वक करा:- ई-केवायसी (E-KYC)- तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर नक्कीच ई-केवायसी करा. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही पुढील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. पीएम किसान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याने हे करणे अनिवार्य आहे, ज्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 ठेवण्यात आली आहे. हेही वाचा-  Schemes for Farmers: शेतकर्‍यांसाठी ‘या’ 5 योजना ठरतायेत वरदान! सोप्या शब्दात समजून घ्या जन्मतारीख- योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची जन्मतारीख अपडेट करणे आवश्यक आहे. फेब्रुवारी 2001 पूर्वी जन्मलेल्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर फेब्रुवारी 2001 नंतर जन्मलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्यांना लाभ मिळाला असेल तर तो आता बंद करण्यात येणार आहे. हेही वाचा-  Safety Tips: पावसाळ्यात दुचाकी चालवताना ‘या’ 6 गोष्टी आधी पाहा; नाहीतर अपघात झालाच म्हणून समजा जमिनीची कागदपत्रे- तुम्हाला तुमच्या जमिनीची कागदपत्रे तुमच्याकडे ठेवावी लागतील आणि ती परिपूर्ण असली पाहिजेत. प्रत्यक्षात अपात्र लाभार्थी आणि खोटी कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पंचायत आणि ग्रामपंचायतींकडून सोशल ऑडिट करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या