Home /News /money /

Schemes for Farmers: शेतकर्‍यांसाठी 'या' 5 योजना ठरतायेत वरदान! सोप्या शब्दात समजून घ्या

Schemes for Farmers: शेतकर्‍यांसाठी 'या' 5 योजना ठरतायेत वरदान! सोप्या शब्दात समजून घ्या

Schemes for Farmers: शेतकर्‍यांसाठी या पाच योजना ठरतायेत वरदान! सोप्या शब्दात समजून घ्या

Schemes for Farmers: शेतकर्‍यांसाठी या पाच योजना ठरतायेत वरदान! सोप्या शब्दात समजून घ्या

Five Government Schemes for Farmers: देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात.

    मुंबई, 6 जुलै : आपल्या देशात जवळपास प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्यांचा उद्देश गरजू आणि गरीब वर्गाला मदत करणे हा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. त्याचबरोबर सध्या या योजनांचा लाभही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला देशात सुरू असलेल्या अशा पाच योजनांबद्दल (Five Government Schemes for Farmers) सांगणार आहोत, ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत आणि शेतकरी त्यांचा लाभ घेऊ शकतात. यापैकी तीन योजना या केंद्रसरकारच्या असून त्या सर्व राज्यांमध्ये लागू आहेत. मात्र दोन योजना या ठराविक राज्यांमध्ये लागू आहेत. 1. पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme)- ही योजना केंद्र सरकार चालवत असून, देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात. 2. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana)- ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्यामध्ये 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु या आधी, तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील असल्यास अर्ज करू शकता. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल. हेही वाचा- वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर 3. प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhan Mantri Kusum Yojana)- या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज देत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा ट्यूबवेल बसवू शकतात. हेही वाचा- तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा विठूरायाचे हे सुंदर स्टेटस; लाईक, शेअर्सचा पडेल पाऊस 4. कूपनलिका योजना (Tube well Scheme) - फक्त उत्तर प्रदेशातील  या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, कारण ही योजना यूपी सरकार चालवते. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कूपनलिका बसवू शकतात. अशाच प्रकारची योजना इतर राज्यांमध्येही चालू होऊ शकते. 5. रयथू बंधू योजना (Rayathu Bandhu Yojana)- तेलंगणा सरकार ही योजना अतिशय लोकप्रिय योजना असून अनेक सरकारं या योजनेचा अभ्यास करत आहेत.   या योजनेंतर्गत, राज्य सरकार पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक 10,000 रुपये आर्थिक सहाय्य पाठवते. जर तुमच्या नावावर स्वतःची जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Farmer, PM Kisan, Scheme

    पुढील बातम्या