JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / Nagpur : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची मोठी संधी, Video

Nagpur : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची मोठी संधी, Video

शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना तसेच शेतकरी ते ग्राहक असा थेट शेतमाल विक्री करता येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 06 जानेवारी : नागपूर   जिल्ह्याच्या परिघात शेतकऱ्यांना सर्वार्थाने पाठबळ लाभावे यासाठी  कृषी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना तसेच शेतकरी ते ग्राहक असा थेट शेतमाल विक्री करता येत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नागपूरच्या वतीने या जिल्हा कृषी महोत्सवचे आयोजन केले आहे.   जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांना खरेदी विक्रीसाठी हक्काचे एक व्यासपीठ नागपूर शहरात येथे 8 जानेवारी पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. कृषी महोत्सवाचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी, शेतीशी संलग्न गट, विविध कंपनी यांसह नागपुरातील चोखंदळ ग्राहकांना होत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. जिल्ह्यातील परिघात तांदूळ उत्पादक शेतकरी ,संत्रा उत्पादक शेतकरी असे विविध स्तरातील शेतकऱ्यांशी संलग्न गट त्यात जसे की हळद उत्पादक शेतकरी, फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी, प्रक्रिया केलेले पदार्थ,बी-बियाणे, अत्याधुनिक यंत्र व तंत्रज्ञान, लोणचे, सरबत, कृषी पूरक उद्योग, सेंद्रिय शेती गटाची शेतमाल विक्रीवर आधारित 200 हून अधिक स्टॉल या महोत्सवात मोफत स्वरूपात शेतकरी व शेतकरी गटाशी संलग्न असलेल्या कंपनीसाठी  उपलब्ध करून देण्यात आले आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषी व कृषी विभागाशी संलग्न सेवा व तंत्रज्ञानावर आधारित परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील कृषी विभागातील प्रगतीची एकंदरीत वाटचाल, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमालाची विक्री, जिल्ह्यातील सेंद्रिय शेती गटाची शेतमाल विक्री व कृषी पूरक उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान, शेतमाल खरेदी दर विक्रेता संमेलन, कृषी उपयोगी अवजारांची प्रदर्शनी इत्यादी बहुआयामी कार्यक्रम या महोत्सवाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

विविध विषयांवर चर्चासत्राचे प्रयोजन येथे भेट देणाऱ्या शेतकरी विद्यार्थी, महिला, पुरुष व नागरिकांना शेती व शेतीशी निगडित विविध विषयांवर अधिक माहिती मिळावी यासाठी रोज विविध विषयांवर चर्चासत्राचे प्रयोजन करण्यात आले आहे. त्यात विद्यापीठाचे तज्ञ, शेतीमधील तज्ञ, यांचे मार्गदर्शन यात घडवून आणले जात आहे. तसेच शेतीशी  निगडित अत्याधुनिक तंत्रज्ञान उपकरण, अवजारे, मशिनरीज त्यांचे प्रदर्शन देखील या महोत्सवात मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनात विविध उपकरणे, ट्रॅक्टर, रोटावेटर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ड्रीप एरिगेशन, बी-बियाणे कंपनी, रासायनिक खते यांचे सुद्धा स्टॉल लावण्यात आले आहे. तांत्रिक माहिती व्हावी यासाठी कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र इतर संलग्न विभाग त्यात रेशीम विभाग, वनशेती यासंदर्भातील देखील स्टॉल आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वसमावेशक माहिती व तंत्रज्ञान या माध्यमातून मिळत आहे.अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा येथील  प्रकल्प उपसंचालक प्रभाकर शिवणकर यांनी दिली. शेतीमाल खरेदी करण्याची संधी जिल्हास्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील माहिती व तंत्रज्ञान व आधारित स्टॉल येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील शेती विषयक वैशिष्ट्ये या कृषी महोत्सवात मांडण्यात आले आहे.या महोत्सवाचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, शेतीशी संलग्न कंपनी आणि नागपुरातील चोखंदळ ग्राहकांना शेतकऱ्यांचा शेतमाल शेतकरी ते ते थेट ग्राहक खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे.   सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते? पाहा Video शेतकऱ्यांसह नागरिकांचा फायदा शेतकऱ्यांसह नागपूरकरांना देखील या महोत्सवाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून उत्स्फूर्त प्रतिसाद या महोत्सवाला लाभत आहे. येत्या 8 जानेवारी पर्यंत या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा येथील प्रकल्प उपसंचालक प्रभाकर शिवणकर यांनी केले आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या