जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते? पाहा Video

सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते? पाहा Video

सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते? पाहा Video

सोनपापडी तयार करणे म्हणजे मोठ्या कौशल्य आणि प्रचंड मेहनतीचे काम आहे.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 05 जानेवारी : सोनपापडी तयार करणे म्हणजे मोठ्या कौशल्य आणि प्रचंड मेहनतीचे काम आहे. नागपुरातील     संत्रा बर्फी इतकीच नागपुरी सोनपापडी प्रसिध्द असून नागपुरातील खाद्य संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. नागपुरातील बजेरिया या भागात अनेक सोनपापडी तयार करणारे कारागीर स्थित असून हा व्यवसाय अनेक वर्षापासून येथे सुरू आहे. सोनपापडी तशी सर्वत्र बघायला अथवा खायला मिळते. मात्र, असे असले तरी नागपुरी सोनपापडीची बातच काही निराळी आहे. नागपुरातील बजेरिया भागात सोनपापडी तयार करणारे अनेक कारखाने असून ते शेकडे वर्षांपासून येथे सोनपापडी तयार करत आहेत. विशेष म्हणजे येथील सोनपापडी महाराष्ट्रासह अन्यत्र मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. माझ्या वडलानंतर मी हा व्यवसाय सांभाळतो आहे. आमच्या इथे आत्ता 5 फ्लेवरमध्ये सोनपापडी उपलब्ध आहे. त्यात इलायची, पायनॅपल ऑरेंज, चॉकलेट, आईस्क्रीमचा समावेश आहे. याशिवाय सोनरोल हा देखील मोठ्या प्रमाणावर मागणीतील पदार्थ आहे. आमच्या इथे अडीचशे ग्रामपासून ते एक किलोपर्यंत पाकीट स्वरूपात सोनपापडी उपलब्ध आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    राज्याबाहेरही विक्री नागपूर येथील सोनपापडी सर्वार्थाने विशेष आहे. आमच्या इथून नागपूरसह इतर राज्यात मध्य प्रदेश, उडीसा गुजरातमध्ये सोनपापडी जात असते. तसेच स्थानिक किरकोळ बाजारातसुद्धा आमच्या इथून सोनपापडी विक्री होते. सोनपापडीच्या बाबतीत तिची चव आणि गुणवत्ता महत्त्वाची असते. कडक स्वरूपाची सोनपापडी आरोग्यास हानिकारक असून ती खाणे टाळले पाहिजे. त्यामुळे चांगल्या गुणवत्ता असलेल्या कारखानदाराकडूनच सोनपापडी खरेदी केली पाहिजे. अशी माहिती लक्ष्मी स्वीटचे प्रोप्रायटर आशिष गुप्ता यांनी सांगितले.   खान्देशातील अस्सल झणझणीत मसाला खिचडी कशी बनवाल? पाहा Recipe Video गुणवत्तेची विशेष काळजी आमच्या इथे दिवसाला 250 ते 300 किलो सोनपापडी दररोज तयार केली जाते. सोनपापडी तयार करणे हे मोठ्या मेहनतीचे व कौशल्याचे काम असून त्याच्या गुणवत्तेची विशेष काळजी घेण्यात येते. सोनपापडी तयार करण्यासाठी मैदा, बेसन, साखर, पाम, ऑइल, इलायची, पिस्ताचा वापर केला जातो. सोनपापडी तयार करताना लागणाऱ्या कच्च्या मालातील भावामधील चढउतारामुळे किंमत कमी जास्त होत असते. आमच्या येथील सोनपापडीला गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नागरिकांची पसंती मिळालेली आहे असे आशिष गुप्ता यांनी सांगितले.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात