70 रुपयांमध्ये वाचेल तुमचा जीव!नागपूरच्या तरुणानं बनवलंय भन्नाट डिव्हाइस 

हेल्मेट तुमचा जीव वाचवू शकते. मात्र, अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालताच गाडी चालवतात. 

किरकोळ जरी अपघात झाला तर जीव जाण्याची धोका असतो.

हेल्मेट घातल्याशिवाय गाडी सुरूच झाली नाही तर अनेकांचा जीव वाचू शकतो. 

नागपूरच्या ऑटोमोबाईल तज्ञ निखिल उंबरक याने एक भन्नाट जुगाड शोधलं आहे. 

अवघ्या 70 रुपयात तयार केलेलं हे यंत्र तुमचा जीव वाचवू शकणार आहे.

निखिल उंबरकर यांनी दुचाकीच्या इग्नेशनला जोडून असे काही सेंसर लावले आहे की दुचाकीस्वाराने हेल्मेट घालून बेल्ट लावला तरच ही गाडी सुरू होते. 

आय आर रिसिव्हर, ट्रांजिस्टर, कॅपॅसिटर बॅटरी वापरून हे सर्कीट तयार करण्यात आले आहे. 

अपघात मुक्त प्रवास व्हावा असा उद्देश डोळ्यापुढे ठेवून हे सर्कीट तयार केले आहे, अशी माहिती ऑटोमोबाईल तज्ञ निखिल उंबरकर यांनी दिली.